• Sat. Jul 5th, 2025

स्किल फॉर स्मार्ट टीचिंग प्रशिक्षण कार्यक्रमास सातशे शिक्षकांनी नोंदविला सहभाग

रोटरी क्लबकडून सात दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा यशस्वी समारोप
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) येथील रोटरी क्लब ऑफ चोपडा आणि पंचायत समिती चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सात दिवसीय डिजिटल स्किल फ़ॉर स्मार्ट टीचिंग प्रशिक्षण कार्यक्रमास तालुक्यातील ७०० शिक्षकांनी सहभाग नोंदवून प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

‘टीच’ या प्रोग्रॅममधील पहिला स्तंभ टी- टीचर्स सपोर्ट (शिक्षकांना सहाय्य) याअंतर्गत शिक्षकांसाठी मोफत डिजिटल कौशल्ये प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. सात दिवस चालणाऱ्या या उपक्रमात १५ आयटी स्किल्सची सीरिज शिक्षकांच्या व्हॉटसअप ग्रुपमध्ये पाठविण्यात आली. दररोज ३ आयटी कौशल्ये व्हिडीओ आणि त्यावरील प्रश्न या whatsapp ग्रुपमध्ये पाठविली जात होती. पुढील दिवशी त्या प्रश्नांची उत्तरे देणारा व्हिडिओ, नवीन कौशल्याचा व्हिडिओ आणि त्यावरील प्रश्न ह्या स्वरुपात ही सीरिज पुढे सुरू होती.

रोटरी क्लब ऑफ चोपडा मार्फत शिक्षकांना हे व्हिडिओ रोजच्या रोज पाठविले जात होते. सहावा दिवस सरावासाठी होता. सातव्या दिवशी ऑनलाईन टेस्ट घेतली गेली व टेस्ट सबमिट केलेल्या शिक्षकांना लगेच सहभागाचे ई-प्रमाणपत्र ईमेलद्वारे देण्यात आले.

सदर उपक्रम दि. ३ ते ९ ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात आला. त्यात शिक्षकांचे व्हाट्सएपचे ३ ग्रुप तयार करण्यात आले होते. शिक्षकांना दररोज ३ व्हिडिओ पाठविले जायचे, शिक्षक आपल्या वेळेनुसार व्हिडिओचा अभ्यास करत व व्हिडिओवर आधारित प्रश्न सोडवित असत. सदर प्रशिक्षण कार्यक्रम सर्वांसाठी खुला व मोफत होता.
चोपडा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले यांनी झूम मिटिंगद्वारे सर्व सहभागी शिक्षकांना मार्गदर्शन केले.
लॉकडाउनच्या काळात शाळा बंद पण शिक्षण सुरू या संकल्पनेतून ‘डिजिटल स्किल फ़ॉर स्मार्ट टीचिंग’ हा प्रशिक्षण कार्यक्रम सामाजिक बांधिलकी जोपासणारा होता. लॉकडाउनच्या काळात शिक्षकांना नवीन शैक्षणिक स्किल शिकण्याची मोठी संधी उपलब्ध झाल्यामुळे शिक्षकांना प्रत्यक्ष वर्गात अध्यापन करताना तसेच ऑनलाइन अभ्यास घेताना सदर स्किलचा निश्चितच फायदा होईल. त्यामुळे असे उपक्रम व प्रशिक्षण रोटरीने नेहमी आयोजित करावेत अशी शिक्षक वर्गाततून मागणी होत आहे.
प्रोजेक्ट यशस्वीतेसाठी रोटरी क्लब चोपडाचे अध्यक्ष नितीन अहिरराव, सचिव रुपेश पाटील, गटशिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले तसेच प्रोजेक्ट चेअरमन पंकज बोरोले, विलास पी. पाटील व सर्व रोटरी क्लब सदस्यांनी परिश्रम घेतले.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.