शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती
मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) देशभरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील सर्वाधिक कोरोना प्रभावित राज्यांच्या यादीत महाराष्ट्र टॉपवर आहे. महाराष्ट्रात कोरना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आता महाराष्ट्र सरकार कोरोना टेस्टिंगसाठी एका नव्या तत्रज्ञानाचा वापर करणार आहे. या तंत्रज्ञानात केवळ आवाजाच्या सहाय्यानेच कोरोना तपासणी होणार आहे, असे स्वतः शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
आदित्य यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. आदित्य ठाकरेंनी ट्विट केले आहे, की ‘बीएमसी आवाजाच्या नमून्याचा वापर करून AI-आधारित कोविड टेस्टिंगचे एक परीक्षण करेल. आरटी-पीसीआर टेस्टिंगदेखील होत राहील, मात्र, जगभरात टेस्ट केल्या गेलेले तंत्रज्ञानान हे सिद्ध करतात, की महामारीने आपल्याला वेगळ्यापद्धतीने विचार करायला आणि आरोग्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करायला मदत केली आहे.
राज्यात कोरोनावर मात करण्यासाठी सरकार सातत्याने नवी पावले उचलत आहे. अशात वॉईस सॅम्पलने टेस्टिंगदेखील एक वेगळे पाऊल आहे.