चोपडा, जि.जळगाव : कोरोना मृतकाच्या संपर्कात आल्याने अडावद येथील ५८ वर्षीय इसम कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यावर चोपडा येथील कोविड केअर सेंटरला औषधोपचार सुरू होते. तब्बल १४ दिवसांनी दि.१६ रोजी त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाने त्यास घरी सोडले. ते चोपडा तालुक्यातील बरे झालेले पहिले रुग्ण ठरले आहेत.
कामधेनू दूध डेअरी परिसरातील ५५ वर्षीय इसमाचा दि.२८ रोजी मृत्यू झाला होता. त्याचा दि.३० रोजी कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याने त्याच्या संपर्कातील येथील ५८ वर्षीय इसमही कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्याच्यावर दि.४ पासून चोपडा कोविड सेंटरला औषधोपचार सुरू होते. त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने सायंकाळी घरी सोडण्यात आले. ते चोपडा तालुक्यातील बरे होणारे पहिले रुग्ण ठरले आहेत.
गेल्या काही दिवसापासून आरोग्य विभागाच्या चोपडा येथील कोरोना रुग्णालयाबाबत नानाविध समस्याबाबत तक्रारी कानी येत होत्या. परंतु अशातच एका इसमाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने कोविड सेंटरला मिळालेल्या यशाचे सर्वांनी स्वागत केले आहे.