• Sat. Jul 5th, 2025

“केअर फॉर ऑल” विषयावरील व्हिडिओ मेकिंग स्पर्धेचा निकाल जाहीर

सुमनालय फाउंडेशनच्या वतीने अनलॉक कालावधीदरम्यान आयोजन

मुंबई – (वृत्तसंस्था) अनलॉक कालावधीमधील “एक मोठे आव्हान गेल्या सहा महिन्यांपासून जगाच्या वेगवेगळ्या भागांमधील आपण आपल्या घरांच्या चार भिंतींमध्ये जीवन अनुभवत आहोत. लॉकडाऊनने प्रत्येक व्यक्तीला / संस्थेला नवीन जीवन जगण्याचा मार्ग शिकवला आहे. काहींनी निरोगी जीवनशैली स्वीकारली आहे, काही लोक एक किंवा इतर कारणांमुळे ही जीवनशैली स्वीकारू शकले नाहीत.
कोविड-१९ मुळे बरेच लोकांनी आपला जीव गमावला आहे. काहीलोकं बचावली आहेत. आता दीर्घ काळानंतर, भारतातील अनेक राज्यांना नवीन परिस्थिती आणि जीवनशैलींचा सामना करावा लागतो आहे. सध्या आपण अनलॉक कालावधीच्या तिसर्‍या टप्प्यात आहोत. जोपर्यंत भारतीय नागरिक काही कठोर सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत नाहीत तोपर्यंत अनलॉक कालावधी हा त्यांच्यासाठी अत्यंत धोकदायक असेल.

एन. जी. आचार्य आणि डी. के. मराठे कॉलेज, चेंबूर येथे समाजशास्त्र विभागच्या सहयोगी प्राध्यापक असलेल्या व सुमनालय फाऊंडेशनच्या अध्यक्ष असलेल्या डॉ. सुजाता वॉरियर यांच्या मते, जोपर्यंत लोक अनलॉक कालावधीत निरोगी सवयी पाळत नाहीत तोपर्यंत कोविड पॉझिटिव्ह केसेस मोठ्या प्रमाणावर वाढत राहतील. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेऊन मुंबईतील सुमनालय फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने “अनलॉक कालावधी दरम्यान सेफ्टी टिप्स” विषयावर “केअर फॉर ऑल” या उद्देशाने व्हिडिओ मेकिंग स्पर्धा आयोजित केली. त्यात एकूण ५१ स्पर्धकांनी भाग घेतला. बक्षिसांसाठी तीन सर्वोत्कृष्ट व्हिडिओ निवडले गेले आहेत.

डॉ. डी. वाय. पाटील मॅनेजमेंट स्टडीज स्कूल, बेलापुर येथील तृतीय वर्षाची विद्यार्थिनी असलेली व जी रोट्रॅक्ट क्लबचे प्रतिनिधित्व करते, रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई बायसाइड ही त्यांची मूळ रोटरी आहे ती कुमारी सीमंतिनी शेडेकर ही प्रथम पारितोषिक विजेती आहे.
रत्नागिरीच्या कीर लॉ कॉलेजमधील लॉ ची विद्यार्थिनी असलेली कुमारी सलोनी राजे ही द्वितीय पारितोषिक विजेती आहे. एन.जी.आचार्य आणि डी.के.मराठे महाविद्यालय, चेंबूर येथील कुमार अभिषेक उपाध्याय हा तृतीय पारितोषिक विजेता आहे. जवळजवळ सर्व स्पर्धकांनी सामाजिक अंतर राखणे, नियमितपणे हात धुणे,मास्क वापरणे, खर्चावर नियंत्रण ठेवणे, खरेदीवर नियंत्रण ठेवणे, भविष्यातील बचत या गोष्टींवर भर दिला आहे ,जेणेकरून बाजारात सतत जाणे टाळता येईल.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की भिन्न पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना मूलभूत सामाजिक प्रश्नांप्रती संवेदनशील करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये समाजात बदल घडवून आणण्यासाठी माध्यमंनिर्माते तरुणांच्या या विचारशक्तीचा आधार घेऊ शकतात.
सुमनालय फाउंडेशनचे सचिव एनयूजे महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर यांना वाटते की , लोकशाही समाजामध्ये, महत्त्वपूर्ण सामाजिक विषयांवर जनजागृती करण्यात तरुण महत्त्वाची भूमिका बजावून त्याद्वारे ते सकारात्मक बदल घडवून आणू शकतात.

देशाच्या निकोप विकासासाठी तरूणाई आणि सामान्य नागरिकांनी तार्किकदृष्या व संवेदनशीलतेने विचार केला पाहिजे. मर्यादित वेळेत माहिती पट बनवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. मॅनेजमेंट , कला, वाणिज्य आणि कायद्यातील विद्यार्थ्यांनी या उदात्त हेतूसाठी प्रयत्न करण्यास रुची दाखवली आहे. ही प्रेरणा आणि दृढनिश्चय चांगल्या कारणासाठी तयार करणे महत्वाचे आहे . कोविड-१९ वर सामाजिक जागरूकता निर्माण करण्यात या माध्यमातून मदत केल्याबद्दल सुमनालय फाउंडेशनकडून मनापासून धन्यवाद व शुभेच्छा.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.