रोटरी क्लब ऑफ चोपडातर्फे ऑनलाइन आयोजन
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्यामार्फत तालुकास्तरीय ऑनलाइन गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा झूम मीटिंगद्वारे घेण्यात आली. यात अमर संस्था संचलित लिटल हार्ट इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी कु. स्वराली पंकज पाटील हिने इ. ८ वी ते १० वी या गटातील एकल गीत गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले.
स्वरालीने ‘ये मेरे वतन के लोगो’ हे गीत सादर केले. या गीतास पंकज पाटील यांनी हार्मोनियमवर साथ केली आकाश नेवे यांनी तबला साथ केली. तिला प्रीती पंकज पाटील यांनी मार्गदर्शन केले. सदर गीत गायन स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. स्वरालीचे अमर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष मनोज चित्रकथी, बालमोहन महाविद्यालयाचे व्यवस्थापक विजय दीक्षित, लिटल हार्ट इंग्लिश स्कूलचे प्राचार्य संजय खैरनार, उत्कर्षा जोशी आदींनी कौतुक केले.