दि. २३ ते २९ ऑगस्ट २०२०
मेष: व्यावसायिक प्राप्ती समाधानकाराक राहिल, नोकरीमध्ये संमिश्र परिनाम मिळतील. संततीच्या बाबतीत अपेक्षित परिनाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. जोडिदाराला चांगल्या संधी चालुन येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. २३, २४,
वृषभ: उद्योग व्यावसायात आवक चांगली राहील. नोकरीमध्ये फारसे बदल जानवनार नाहीत.संततीच्या बाबतीत तव्येतीचे त्रास राहतील. विद्यार्थ्याना संमिश्र परिनाम मिळतील. सरकारी कामासाठी जास्त प्रयत्न घ्यावे लागतील. अनपेक्षीत खर्चाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षीत सहकार्य लाभेल. शुभ ता. २३, २४, २५, २६,
!!🚩 ज्योतिष सेवा मनुरकर” !!
मिथुन: व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. अचूक व्यापारी अंदाजातून लाभ मिळतील. नोकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील. संततीला चांगल्या संधी चालून येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाने यश मिळेल. सरकारी कामात अनुकुलता रहिल. अंगिकृत कार्यात सफलता मिळेल. भावंडांच्या बाबतीत शुभ घटना घडतील. शुभ ता. २५, २६, २७, २८, २९
कर्क: उद्योग व्यावसायात धाडसी निर्णयातून लाभ मिळतील. नोकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. अर्थिक आवक चांगली राहील. संततीच्या आडलेल्या प्रश्नांतून मार्ग निघतील. विद्यार्थाना मनाप्रमाने यश मिळेल. कौटुंबिक बाबतीत विनाकारण तणावाचे वातावरण राहील. डोळ्यांच्या विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासामधून संमिश्र परिणाम मिळतील. शुभ ता. २८, २९
सिंह: व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नोकरीमध्ये सामंजस्याची भुमिका लाभदायक ठऱेल. संततीच्या बाबतीत चांगल्या बातम्या समजतील. विद्यार्थ्याना मनाप्रमाणे यश मिळेल. रक्तदाब असलेल्यानी तब्यतीची काळजी घ्यावी. सरकारी कामात प्रयत्नाने यश. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र मंडळींकडून अपेक्षीत सहकार्य लाभेल. शुभ :- २३, २४,
कन्या: उद्योग व्यावसायात आवक चांगली राहिल. नोकरीमध्ये मनाविरूद्ध घटना घडतील. संततीच्या तब्येतीच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. उष्णतेच्या विकारापासुन काळजी घ्यावी. सरकारी कामात अडचणी येतील. होत आलेली कामे बिघडतील. मित्र-मंडळींचा सल्ला फायदेशीर ठरेल. शुभ ता. २५, २६, २७.
तूळ: उद्योग व्यावसायात प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. नोकरीमध्ये समाधान देणाऱ्या घटना घडतील. संततीच्या कामात बाधा निर्माण होतील. विद्यार्थ्यांना मना प्रमाणे यश मिळेल. जोडीदाराच्या वागण्यामुळे कुटुंबात तणाव निर्माण होईल. सरकारी कामा करीता अनुकुलता राहील. प्रवासातुन कामे यशस्वी होतील. शुभ ता. २३, २४, २८, २९.
वृश्चिक: व्यावसायीक आवक चांगली राहील. नोकरी मध्ये वरीष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. संततीमुळे खर्चाचे प्रमाण वाढते राहील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींवर आवलंबून राहू नये. शुभ ता. २५, २६, २७.
धनु: संतती हट्टीपणाने वागेल. अति आत्मविश्वास विद्यार्थ्यांचे नुकसान करेल. जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. व्यावसायिक स्थिती मनासाखी राहणार नाही. नोकरीमध्ये ठरलेल्या कामात बाधा येतील. वडिलधाऱ्यांबरोबर वादाचे प्रसंग. प्रवासातुन कामे सफल होतील. शुभ ता. २३, २४, २८, २९.
मकर: व्यावसायिक आवक चांगली राहील. पण खर्चाचा मेळ बसणार नाही. नोकरीत मनस्तापाचे प्रसंग येतील. सरकारी कामा मध्ये अडचणी निर्माण होतील. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना खूप निराशा जाणवेल. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे. कुसंगत टाळावी. प्रवास फायदेशीर ठरेल. शुभ ता. २३, २४, २५, २६.
कुंभ: उद्योग-व्यावसायत प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या कामात सफलता लाभेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता लाभेल. सरकारी कामाकरीता अनुकुलता राहील. विवाहयोग जुळुन येतील. भावंडांच्या बाबतीत चांगली बातम्या समजतील. प्रवासातून कामे यशस्वी होतील. शुभ ता. २५, २६, २७, २८, २९.
मीन: व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये सहकाऱ्यांकडून चांगले सहकार्य लाभेल. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात सफलता लाभेल. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढते राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. प्रवास फायदेशीर ठरतील. मित्रांची संमिश्र साथ. शुभ ता. २८, २९.