ज्येष्ठा गौरी
ज्येष्ठा गौरी हा सण नक्षत्र प्रधान आहे. २५|०८|२०२० दुपारी १३|५९ पासून अनुराधा नक्षत्र सुरुवात होते. अनुराधा नक्षत्रावर गौरीचे अवाहन केले जाते.
२६|०८|२०२० बुधवारी दुपारी ०१|०४ मिनिटांपासून ज्येष्ठा नक्षत्र आहे.
ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीपूजन केले जाते.
२७|०८|२०२० गुरुवारी १२|३७ मिनिटांपासून मूळ नक्षत्र आहे.
मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन केले जाते.
या वर्षी दि. २५|०८|२०२० रोजी मंगळवारी दुपारी दोन नंतर अनुराधा नक्षत्र सुरू होते तेंव्हा त्या दिवशी दुपारी २ नंतर केंव्हाही ज्येष्ठा कनिष्ठा गौरीचे अवाहन* करून आपल्या घरात आणाव्यात.
दि. २८|०८|२०२० रोजी बुधवारी ज्येष्ठा नक्षत्र दुपारी ०१ वाजून ०४ मिनिटांनी सुरू होते. म्हणजे दुपारी ०१|०४ मिनिटांपासून गौरीचे आपल्या घरातील प्रथेप्रमाणे पूजन ,नैवेद्य समर्पण,आरती आदी करावे.
दि. २७|०८|२०२० रोजी गुरूवारी दुपारी १२|३७ मिनिटांपासून मूळ नक्षत्र सुरू होते.
या दिवशी दुपारी १२|४० पासून गौरी विसर्जन करावे.
प्रत्येकाने आपल्याला कुलाचारानुसार पडलेल्या प्रथेचे पालन करून हा सण साजरा करावा.
नक्षत्र प्रधान सण असल्याने इतर कोणत्याही चौघडीया, राहू काळ, विजय मूहूर्त इत्यादि पाहण्याची अवश्यकता नाही. श्रध्देने त्या त्या नक्षत्र कालात पूजन होणे महत्वाचे आहे.
शुभं भवतु