जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जळगाव शहरासह जिल्हाभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्हाधिकारी व जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्या ढिसाळ कारभारामुळे संतापाची लाट उसळली होती. त्यातच जिल्हा रुग्णालयात करोनाबाधित वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाची वरिष्ठांनी दखल घेऊन तात्काळ रुग्णालयातील दोषींवर कार्यवाही केली. तसेच जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे हे देखील करोनाला आळा घालण्यात अपयशी ठरल्याने त्यांची उचलबांगडी करण्यात आली असून, 2013 बॅचचे आयएएस अधिकारी असलेले अभिजित राऊत यांनी गुरुवारी जळगांवचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे.