‘केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे’प्रमाणे बांधली लग्नगाठ
जळगाव (साथीदार वृत्तसेवा) येथील अलखैर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष युसुफ शाह यांनी आपले स्वतःचे लग्न शुक्रवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी वरणगाव येथील अकसा मशिदीमध्ये अत्यंत साध्या व सरळ पद्धतीने संध्याकाळी साडेपाच वाजता लावले.
उपस्थितांना शरबत पाजून जेवणावळीला फाटा देण्यात आला.
या विवाह सोहळ्यासाठी जळगावहून खास आमंत्रित मुफ्ती अतिकूररहेमान यांनी साध्या व सरळ विवाहाबाबत अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद सस यांच्या जीवन चरित्रावरील माहिती विशद केली. युसुफ शहाने आपला विवाह केल्याबद्दल त्यांचे वधूचे वडील साबीर शाह रौशन शाह, वराचे वडील महेबूब शाह यांचे विवाहाबाबत अभिनंदन केले.
या विवाह सोहळ्यासाठी वकील म्हणून वरणगावचे मुशीरशाह सुपडू शाह, तर साक्षीदार म्हणून जळगाव मनियार बिरादरीचे फारुक शेख अब्दुल्ला व दुसरे साक्षीदार रशीद शाह हसन शाह होते.
खुतब ए निकाह जळगावचे मुफ्ती अतिकूररहेमान यांनी पठण केले व या कारवाईत अकसा मशीद वरणगावचे मौलाना महमूद यांनी सहकार्य केले.
या विवाह सोहळ्यासाठी जळगाव येथून मर्यादित वरात आली होती त्यात प्रामुख्याने जळगाव येथील मुस्लिम इदगाह ट्रस्टचे अनिस शाह,अल हिंद चे अलताफ शेख, भुसावळचे नगरसेवक इम्तियाज शेख, उस्मानिया नगर चे समीर शेख ,हाफिस मुसा पटेल, मुक्ताई नगर चे अल्ताफ आझाद, बादशाह आदींची उपस्थिती होती.
फोटोमध्ये युसूफ शाहसोबत फारूक शेख,इम्तियाज शेख, अल्ताफ आझाद आदी दिसत आहेत.