चोपडा (साथीदार वृत्तसेवा) श्री महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त चोपडा शहरात महाराजा अग्रसेन समाज (अग्रवाल समाज) तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
इंडियन रेडक्रॉस सोसायटी रक्तपेढी, चोपडा यांच्या मदतीने त्यांच्या ब्लड बँकेत हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले. या शिबिरात अग्रवाल समाजातील 27 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन समाजाच्या कल्याणासाठी आपले कर्तव्य पार पाडले. या रक्तदात्यांपैकी 18 पुरुष आणि 9 महिलांनी रक्तदान केले.
Ya शिबिराच्या माध्यमातून श्री महाराजा अग्रसेन यांच्या जयंतीनिमित्त अग्रवाल समाजाने मानव कल्याणाचा एक आदर्श उदाहरण घालून दिला.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटी ब्लड बँकेची संपूर्ण मदत पथक, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि डॉ. मोहित प्रवीण अग्रवाल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
महाराजा अग्रसेन बहुउद्देशीय मंडळ चोपडा, अग्रवाल महिला मंडळ आणि अग्रवाल युवा संघटना यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.