औरंगाबाद (सतीश लोखंडे) जिल्ह्यात शिवभोजन केंद्रामधून गरीब व गरजू व्यक्तींना शिवभोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्हयामधून २७ शिवभोजन भोजनालयामधून गरीब गरजू व्यक्तींना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे.
परंतु, कोरोना या संसर्गजन्य विषाणूंमुळे जागतिक महामारीची परिस्थीती उदभवल्याच्या पार्श्र्वभूमीवर ब्रेक द चेनची प्रक्रिया राज्यभर सुरू झाली आहे. राज्यशासनाच्या सुधारीत निर्दशानुशार १५ एप्रिल पासून ते १४ सप्टेंबर पर्यंत शिवभोजन लाभार्थ्यांना निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येत आहे.
या कालावधीमध्ये चालू शिवभोजन केंद्रांचा इष्टांक दिडपट केलेला आहे. १५ एप्रिल ते २३ ऑगष्ठ पर्यत ५ लक्ष ६२ हजार १०९ गरीब व गरजू लाभार्थ्यांना निःशुल्क शिवभोजन वाटप करण्यात आलेले आहे. त्यामुळे गरीब गरजू व्यक्तींनी शिवभोजन निःशुल्क लाभ घेण्यात यावा असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी केले आहे.