• Sat. Jul 5th, 2025

जप्त केलेल्या स्क्रॅप ऑटोरिक्षांचा ४ जुलैला उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात लिलाव

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) – उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव या कार्यालयाच्या वायुवेग पथकास अवैधरित्या प्रवासी वाहतुक करतांना आढळून आलेल्या ऑटोरिक्षांविरुध्द विशेष मोहिमेत जप्त केलेल्या 10 ऑटोरिक्षांची नोंदणी या कार्यालयाच्या अभिलेख्यांवर असल्याचे दिसून येत नाही. त्या भंगार/स्क्रॅप 10 रिक्षांचा लिलाव उप प्रादेशिक कार्यालय, जळगाव येथे दिनांक 4 जुलै, 2020 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर स्क्रॅप स्थितीतील 10 ऑटोरिक्षा लिलावातून खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी जास्तीत-जास्त रक्कमेचा धनाकर्ष (DD) उप प्रादेशिक कार्यालय, जळगाव येथे दिनांक 3 जुलै, 2020 रोजी सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत अर्जासह जमा करावा. दिनांक 4 जुलै रोजी दुपारी 12 वाजता सर्व अर्जदारांच्या समक्ष लिफाफे उघडण्यात येतील. व सर्वाधिक धनाकर्ष (DD) सादर करणाऱ्यास सदरच्या 10 ऑटोरिक्षा विकण्यात येवून त्या ऑटोरिक्षांचे तुकडे करूनच त्यांच्या ताब्यात देण्यात येतील. त्या रिक्षा रस्त्यावर चालविणार नाही अथवा त्या कोणालाही वापरण्यास देणार नाही असे शपथपत्र संबंधितांना उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक असेल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.