चोपडा (साथीदार वृत्तसेवा): ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन आणि केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमाती मोर्चाने, अनुसूचित जमाती विभागाचे जिल्हाध्यक्ष मगन बाविस्कर (सर) यांच्या नेतृत्वाखाली कमला नेहरू मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील गरीब व गरजू विद्यार्थिनींना वह्या वितरित करून त्यांना सहकार्य केले.
या उपक्रमाच्या अंतर्गत चोपडा तालुक्यातील आदिवासी पाड्यांच्या वस्ती आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ३० हजार अनुसूचित जमातीच्या गरीब विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले, आणि हा कार्यक्रम त्याचाच एक भाग होता.
क्रांतीदिवस आणि आदिवासी दिवसाचे औचित्य साधून ९ ऑगस्ट रोजी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप पाटील, रवींद्र मराठे, दीपक बाविस्कर, वसतिगृह अध्यक्ष महेश शिरसाठ, अधीक्षिका कावेरी कोळी यांच्यासह विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.