चोपडा येथे स्थायिक असलेले बोथरा ट्रेडींग कंपनीचे संचालक व दादावाडी ट्रस्टचे अध्यक्ष बाबूलाल बोथरा यांची पुतणी व बाडमेर (राजस्थान) येथील रहिवासी मुमुक्षु आत्मा आरती बोथरा व निशा बोथरा या भगिनी खरतरगच्छाधिपती आचार्य श्री जिनमणिप्रभ सुरीश्वरजी म. सा. यांच्या आज्ञानुवर्तीनी डॉ. विद्युत प्रभा श्रीजी म. सा. सानिध्यात जैन धर्मातील दीक्षा ग्रहण करणार आहेत. आरती व निशा चोपड्यात आले असता त्यांना बग्गीमध्ये बसवून वरघोडा काढण्यात आला. यावेळी शेकडो पुरुष महिला व बालकांच्या उपस्थितीत
बँड पथक लावून व निर्मल बोरा व राहुल राखेच्या यांनी भजने गाऊन भक्तिमय वातावरण निर्माण केले.
शहरातील आशा टॉकीजमार्गे गोल मंदिर, मेन रोड, शनी मंदिर येथून मार्गक्रमण करीत श्री मुनिसुव्रत स्वामी जैन मंदिर येथे वरघोडाचा समारोप करण्यात आला. समारोपानंतर उपाश्रय हॉल येथे जिन कुशल महिला मंडळाच्या सदस्यांनी दीक्षार्थीं भगिनींचे उत्साहात स्वागत केले.
तद्नंतर सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आले.
श्री वर्धमान जैन श्री संघचे पदाधिकारी माजी संघपती माणकचंद चोपडा, जामनेर कॉलेजचे माजी प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश अलिझाड, उद्योजक अनिल बुरड, उपाध्यक्ष नेमीचंद कोचर, राजेंद्र छाजेड दादावाडी ट्रस्टचे अध्यक्ष बाबूलाल बोथरा, विश्वस्त सुनील बरडिया, दीपक राखेचा, किशोर डड्डा, मिलिंद खिलौसिया आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते दीक्षार्थींचा सत्कार करण्यात आला. माणकलाल चोपडा यांनी मनोगत व्यक्त केले.
के. डी.ओ. जैन मंदिर ट्रस्ट व श्री वर्धमान स्था.जैन श्री संघचे पदाधिकारी व जिन कूशल महिला मंडळ सदस्य यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते तिलकचंद शहा, हिराचंद लोडाया, प्रवीण टाटिया, धरमचंद टाटिया, शांतीलाल टाटिया, प्रकाशचंद राखेचा, मंगलचंद राखेचा यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महावीर पतपेढीचे संचालक गौतम सांड, प्रवीण राखेचा, विनोद बरडिया, शांतीलाल कोचर, रमेश बोथरा, नितीन बरडिया, भिकमचंद अलिझाड, कुशल बुरड, अभय ब्रम्हेचा आदींनी मेहनत घेतली.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन दीपक राखेचा यांनी केले. आभार प्रदर्शन जितेंद्र बोथरा यांनी केले.
सत्काराला उत्तर देताना आरती बोथरा व निशा बोथरा यांनी 16 फेब्रुवारी 2025 ला बाडमेर येथे होणाऱ्या दीक्षा महोत्सवासाठी सर्व समाज बांधवांना आणि भगिनींना उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.