रोटरी क्लब व एसएसएस मेंटोरचा उपक्रम
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) इयत्ता आठवी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण कोणत्या शाखेत घ्यावे, याचा निर्णय घेता यावा. यासाठी उपयुक्त, साहयभूत ठरणाऱ्या मोफत कलचाचणी व करिअर मार्गदर्शन शिबीराचे रोटरी क्लब चोपडा व एसएसएस मेंटोर, पुणे यांच्या वतीने आयोजन करण्यात आलेले आहे.
यासाठी इच्छूक विद्यार्थी – विद्यार्थिनींकरीता
https://candidate.speedexam.net/register.aspx?site=sssmentorspune
या लिंकवर दि. ३०जून २०२० पर्यंत प्रथम मोफत चाचणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच दि. १ जुलै २०२० रोजी सर्व विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण कोणत्या शाखेत घ्यावे याचा निर्णय घेण्यास मदत होणार आहे. वरील लिंकवरील कलचाचणी परीक्षेतून एकूण २५ गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी – विद्यार्थिनी निवडून त्यांना पुढील २ वर्षे मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
इच्छूकांनी अधिक माहितीसाठी रोटरी क्लब, चोपडाचे
अध्यक्ष रोटे. नितीन अहिरराव ९८२३३५५५९९, सचिव रोटे. रुपेश पाटील ९९७५२०६९३९, प्रकल्प प्रमुख रोटे. गौरव महाले ९८२२३४४८५८ तसेच एस एस एस मेंटोरचे समीर प्रतिनिधी ९७६५८५७६१०
योगेश यावलकर ९८२२६९६५९९ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.