चैतन्यनगर जेष्ठ नागरिक संघात दि. 26/1/26 ला प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी 8/30 वाजता ध्वजारोहण ऍड. अरुण धांडे याचे हस्ते करण्यात आले. ध्वजारोहणा नंतर ध्वज वंदन, व सामूहिक राष्ट्रगीत झाले. तसेच नंतर सभा आयोजित करण्यात आली.
व्यासपीठावर अध्यक्ष ऍड अरुण धांडे, सचिव विकास बोरोले, पंडितराव सोनार, सौ आशा तळेले, होते. प्रा. पाटील एस एल, पी आर सोनार, सुभाष सोनावणे, प्रतिभा पाटील यांनी प्रजासत्ताक दिनासंबंधी , स्वातंत्रपूर्वीचा काळ, स्वातंत्र्य चळवळ, हक्क, संबंधी छान माहिती दिली, सौ उषा सोनावणे, अंजली चौधरी, भारती पाटील, पुष्पा पाटील, आशाताई तळेले यांनी राष्ट्रागीते सादर केली.
अध्यक्ष ऍड अरुण धांडे यांनी संघांचे कार्य व प्रजासत्ताक दिनसंबंधी माहिती दिली.छान सूत्रसंचालन प्रा. श्री ए टी चौधरी यांनी सादर केले. श्री विश्वास सोनावणे, उमेश पाटील, दिलीप बोरसे, कार्यकारिणी संचालक यांनी कार्यक्रम यशस्वीते साठी परिश्रम घेतले. सामूहिक पसायदानाने सभेची सांगता झाली. सभेस 55सभासद उपस्थित होते.
