• Sat. Jul 5th, 2025

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पोलीस अधिकाऱी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन

राष्ट्रपती पदक, शौर्य, प्रशंसनीय सेवा पदक जाहीर

मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) ‘महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्रातील ५८ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर करण्यात आली आहेत. यात उत्कृष्ट सेवेकरिता ५ ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, १४ पोलीस शौर्य पदक आणि प्रशंसनीय सेवेकरिता ३९ ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.

या सर्वांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे, असे नमूद केले आहे. या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी महाराष्ट्र पोलीसांचे “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” ब्रीद उंचावणारी कामगिरी केली आहे. या कामगिरीसाठी सर्वांना सलाम, आणि जाहीर पुरस्कारासाठी या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असेही त्यांनी म्हटले आहे.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.