चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) कृषि उत्पन्न बाजार समितीतर्फे दिनांक 12/09/2020 ते 17/09/2020 पर्यत सहा दिवस मार्केट कमेटी मधील भुसार मालाचे व्यापार व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत.
याबाबत, चोपडा तालुक्यातील सर्व शेतकरी, व्यापारी व हमाल मापाडी बांधवानी नोंद घ्यावी, अशी माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, चोपडा कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन संचालक व दोन व्यापारी बांधवाना कोरोनाची लागण झाल्यामुळे दिनांक 12/09/2020 ते 17/09/2020 पर्यंत सहा दिवस मार्केट कमेटीमधील भुसार मालाचे व्यापार व्यवहार बंद ठेवले आहेत. सदर कालावधीत आपला शेतमाल बाजार समितीत विक्रीस आणू नये, अशी विनंतीही बाजार समितीकडून शेतकऱ्यांना करण्यात आली आहे.