चोपडा (साथीदार प्रतिनिधी) माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त तालुका व शहर भाजपातर्फे शुक्रवारी सुशासन दिन साजरा करण्यात आला.
या वेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते व राज्य भाजपा किसान मोर्चाचे माजी उपाध्यक्ष श्री. शांताराम भावलाल पाटील, माजी पं. स. सभापती आत्मारामभाऊ म्हाळके, चंद्रशेखर पाटील (खर्डी), तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जैस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
याप्रसंगी प्रमुख वक्ते शांताराम पाटील यांनी, जनसंघ ते भाजप वाटचाली संदर्भात सविस्तर माहिती देऊन कार्यकर्त्यांची जाण ठेवणारा पक्ष म्हणजे भाजपा असे आवर्जून सांगितले. याप्रसंगी जिल्हा भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यक्ष पदी सौ. विजयाताई सुभाष पाटील यांची निवड झाल्याबद्दल तालुका महिला आघाडी अध्यक्षा सौ. ज्योत्सना चौधरी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शहर सरचिटणीस पदाच्या रिक्त जागेवर हेमंतभाऊ जोहरी यांची निवड शहराध्यक्ष गजेंद्र जैस्वाल यांनी घोषित केली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार पालिवाल यांनी स्व. अटलजींच्या आठवणी सांगितल्या. अड .एस. डी. सोनवणे यांनी जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत भाजपचे पाईक असल्याचे आवर्जून सांगितले. या वेळी ज्येष्ठ कार्यकर्ते शांताराम पाटील, अनिलकुमार पालिवाल, हिंमतराव पाटील, हनुमंतराव महाजन, लक्ष्मण पाटील आदि ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प.स.सदस्य भरत बाविस्कर, मगन बाविस्कर, नरेंद्र पाटील, सुभाष पाटील, सुनील सोनगिरे, संजय श्रावगी, अमित तडवी, कृबान तडवी, पींटू पावरा, दिनेश पावरा, वसंत पावरा, गजानन कोळी, सुरेश चौधरी, मोहिते भावे, भूषण महाजन, अजय राजपूत, यशवंतराव जडे, विजय पाटील, विजय बाविस्कर, जिल्हा उपाध्यक्ष राकेश शांताराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व.अटलजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक पंकज पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन गजेंद्र जैस्वाल यांनी केले.