चोपडा (साथीदार वृत्तसेवा) शहर, तालुका बुथप्रमुख, शक्तीकेंद्रप्रमुख यांची आढावा बैठक सकाळी 10 वा. परिश्रम मंडपम् हाॅल येथे जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात अाली होती.
वबैठकीच्या प्रारंभी दीपप्रज्वलन आणि भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रेरणास्थान डाॅ. श्यामाप्रसाद मुखजीॅ यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले,

या समर्थबुथ, शक्तीकेंद्र प्रमुख आढावा बैठकीचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष पंकज पाटील यांनी केले.
जिल्हा संघटन सरचिटणीस सचिन पान-पाटील यांनी ग्रामिण व शहरी बुथरचना व शक्तिकेंद्र अभियानाचा आढावा घेतला. यानंतर जेष्ठनेते तथा पं. स. सभापती आत्माराम म्हाळके, जिप. सदस्य शांताराम पाटील, चंद्रशेखर पाटील, जी. टी. पाटील सर, चोपडा तालुका पालक महेश पाटील (अमळनेर ) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानंतर खासदार रक्षाताई खडसे यांनी मार्गदर्शन केले.
सातपूडा पर्वत रांगेतील अतिदर्गम भागात खाजगी विमान कोसळले या विमानातील प्रशिक्षणार्थी महिला जखमी झाली होती, तेव्हा तेथे उपस्थित वर्डी येथील आदिवासी महिला सौ. विमलबाई भिल यांनी आपल्या अंगावरची साडी देवून सबंधित महिला पायलट यांना संकटकाळात देवदुत म्हणून मदत केली होती. याप्रसंगी सौ. विमलबाई भिल यांचा पुष्पगुष्छ देवून सत्कार खासदार रक्षाताई खडसे, जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच पदेशात जर्मनी येथे आयोजित ‘आयर्न मॅन’ स्पर्धेत चहाडीॅ येथील डाॅ. देविका पाटील यांनी घवघवीत यश संपादन केल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी आजोबा व भाजपाचे ज्येष्ठ नेते जी. टी. पाटील सर यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार मान्यवरांनी केला.
खासदार रक्षाताई खडसे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात केंद्र सरकारच्या विविध योजना सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जनतेपर्यत पोहचवाव्यात असे आवाहन केले. यात आयुष्यमान भारत योजना अंतर्गत गोरगरीब नागरीकांना जास्त फायदा होईल असे प्रयत्न शक्तिकेंद्र व बुथप्रमुखांनी करावे
असे आवाहन केले. PM किसान सन्मान निधी योजना शेतकर्यासाठी फायद्याची आहे. तिचा लाभ वंचित शेतकर्यांपर्यंत पोहचवा, तसेच काल जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत झालेल्या विविध चर्चाचा आढावा थोडक्यात खासदार रक्षाताई यांनी या आढावा बैठकीत मांडला. त्यांनी, वीजजोडणीसंदर्भात, केळी पिक विमा, ग्रामपंचायतींच्या वाॅटर सप्लाय, कनेक्शन तोडणी संदर्भात झालेल्या निर्णयाबद्दलची माहिती दिली.

जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कार्यकर्त्यांनी आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच नगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज रहावे असे आवाहन केले. त्यानुसार पदाधिकारी, बुथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी जनतेपर्यत केंद्र सरकारच्या विविध योजना, आरोग्य विषयक, शेतीविषयक अडचणी, प्रश्न सोडविण्याठी सदैव सकारात्मक असावे, असेही आवाहन केले. यावेळी भाजपच्या तालुका विविध आघाड्यांच्या अध्यक्षांना नियुक्तीपत्रक व पुष्पगुच्छ देवून आमदार राजुमामा भोळे, खासदार रक्षाताई खडसे यांनी भावी वाटचालीसाठी अभिनंदन केले.
अडावद-धानोरा-वर्डी परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे,खासदार रक्षाताई खडसे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या बैठकीसाठी जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हादभाऊ पाटील,नंदुभाऊ महाजन, राकेश पाटील, तालुकापालक महेश पाटील, सरचिटणीस हर्षलभाऊ पाटील, सचिन पानपाटील, बाजार समितीचे व्हाइस चेअरमन मुरलीधर बाविस्कर, चंद्रशेखर पाटील, विस्तारक प्रदीप पाटील, जि.प.महिला बालकल्याण सभापती सौ. ज्योतीताई पाटील, सौ. उज्वलाताई म्हाळके, जिल्हा चिटणीस सौ. रंजनाताई नेवे, कमलताई पाटील, जि.प. सदस्य गजेंद्र सोनवणे, चोपडा पं.स.सभापती प्रतिभाताई पाटील, तालुका महिला अध्यक्ष सौ. जोस्त्नाताई चौधरी, शहराध्यक्षा सौ.माळी, उपसभापती भुषण भिल, तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल, राज्य परिषद सदस्य अनिल पाटील, अनुसूचित जमाती जिल्हाध्यक्ष मगन बाविस्कर, सहकार आघाडी अध्यक्ष हिंमतराव पाटील, बाजा समिती संचालक धनंजय पाटील, रविंद्र पाटील, शहराध्यक्ष रविंद्र मराठे, सरचिटणीस हनुमंतराव महाजन, चंद्रकांत धनगर, सुनील सोनगिरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, भरत सोनगिरे, युवा शहराध्यक्ष तुषार पाठक, चंद्रशेखर ठाकरे, बापूराव पाटील, जितेंद्र चौधरी, विनायक पाटील, डाॅ. विक्की सनेर, ओबीसी अध्यक्ष कांतिलाल पाटील, भरत पाटील, डाॅ. भारती दिक्षित, अल्पसंख्याक अध्यक्ष संजय जैन, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, अशोक बागुल, समाधान पाटील, रावसाहेब पाटील, मंडळबुथ प्रमुख विजय बाविस्कर, विठ्ठल पाटील, डाॅ. आशिष पाटील, मिलिंद वाणी, पिंटू पावरा, एकनाथ पाटील, दत्तात्रेय पाटील, अमित तडवी, अरीफ तडवी, प्रशांत देशमुख, डाॅ. मनिष अडावकर, श्याम पाटील, विनोद धनगर, नंदु धनगर, परेश धनगर, योगराज पाटील, प्रवीण पाटील, रावसाहेब सोनगिरे, नितीन राजपूत, विवेक गुजर, विजय धनगर, अमोल शिंपी, बबन पाटील, सुभाष कोळी, विजय पाटील, दिनेश जाधव, मिलिंद पाटील, रविंद्र पाटील, सुभाष पाटील, धर्मदास पाटील, संभाजी पाटील, मोहित भावे, गोपाल पाटील, शुभम् चौधरी उपसरपंच चुंचाळे, लक्ष्मण पाटील, किशोर बाविस्कर, विजय भिल, शरद पाटील, अर्शदखाँ काजीशेठ, भैय्या सोनवणे, कैलास पाटील आदी कार्यकर्ते, शक्तिकेंद्र प्रमुख, बुथप्रमुख, विविध आघाड्याचे पदाधिकारी, विविध गावांचे सरपंच व सदस्य या आढावा बैठकीसाठी उपस्थित होते. सूत्रसंचलन हनुमंतराव महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन राकेश पाटील यांनी मानले.