चोपडा (साथीदार वृत्तसेवा) राज्यातील सत्ताधारी सरकारने केंद्रिय मंत्री ना.नारायण राणे यांना द्वेषाने अटक केल्याच्या निषेधार्थ व राणेंच्या समर्थनार्थ आज चोपडा मंडल भाजपाकडून धरणगाव नाका रस्त्यावर रस्तारोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी चोपडा विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रदिप पाटील, तालुकाध्यक्ष पंकज पाटील, जिल्हा चिटणीस रंजनाताई नेवे, सहकार आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव पाटील, धनंजय पाटील, माज शहराध्यक्ष रविंद्र मराठे, जिल्हा अनुसूचित जमाती अध्यक्ष मगन बाविस्कर, सरचिटणीस, चंद्रकांत धनगर, भरत सोनगिरे, बापूराव पाटील, युवामोर्चा अध्यक्ष प्रकाश पाटील, युवामोर्चा शहराध्यक्ष तुषार पाठक, ओबीसी मोर्चा अध्यक्ष कांतिलाल पाटील, चंद्रशेखर ठाकरे, डाॅ.आशिष पाटील, गोपाल पाटील, अल्पसंख्याक अध्यक्ष, संजय जैन, अर्शद खान, लक्ष्मण पाटील, संभाजी पाटील, नितिन पाटील, विवेक गुजर, धर्मदास पाटील, शालिक धनगर, अमित तडवी दिपक बाविस्कर, भुषण महाजन, विजय बाविस्कर, बाळु पाटील, सुरेश चौधरी, विकास पाटील, भरत पाटील, केतन चौधरी, आदि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.