चोपडा (साथीदार वृत्तसेवा): येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयात वार्षिक नियतकालिक अंक संपादक मंडळातर्फे ‘शरभंग’ वार्षिक नियतकालिक अंक प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी स्वरा प्रशांत अनवर्दकर, साक्षी रवींद्र पारधी, निकिता या विद्यार्थिनींनी गायलेल्या सुरेल स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील तसेच माजी शिक्षणमंत्री कै. अक्कासो सौ. शरच्चंद्रिका सुरेश पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील तसेच संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिता संदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी हे उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक व चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश्वर हिरे, पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, राम चंद्रशेखर मांडगे, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी, उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, उपप्राचार्य डॉ. ए. बी. सूर्यवंशी, वरिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक ए. एन. बोरसे तसेच समन्वयक पी. एस. पाडवी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक पी. एस. पाडवी यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय ‘शरभंग’ वार्षिक नियतकालिक अंकाचे संपादक डॉ. एम. एल. भुसारे यांनी करून दिला.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या ‘शरभंग २०२३-२४’ या वार्षिक नियतकालिकाच्या ५४ व्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक योगेश्वर हिरे यांनी उदघाटनपर मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, ‘विद्यार्थ्यांनी समाजाचे निरीक्षण करून आपले विचार, अनुभव लेखणीच्याद्वारे महाविद्यालयीन नियतकालिकांमध्ये मांडायला हवेत. त्यातून वैचारिकतेस व लेखनास प्रेरणा मिळेल’.
पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी बाळगून आपल्यातील क्षमता ओळखायला हव्या. आपल्यातील लेखन कौशल्य नियतकालिकाच्या माध्यमातून विकसित करायला हवे’. यावेळी राम मांडगे यांनी ‘विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करून अडचणींचा सामना करावा व ध्येय निश्चित करून त्या मार्गाने मार्गक्रमण करावे’ असे आवाहन केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणाले की , ‘विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्याला प्रेरणा मिळावी तसेच विद्यार्थ्यांमधील लेखकाला व्यासपीठ मिळावे, या अनुषंगाने ‘शरभंग’ हे महाविद्यालयाचे नियतकालिक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. विविध लेख, मुखपृष्ठावरील चित्र विद्यार्थी रेखाटतात. यातूनच विद्यार्थ्यांची जडणघडण होते. विद्यार्थ्यांनी आपले विचार,अनुभव महाविद्यालयीन नियतकालिकातून मांडायला प्रवृत्त झाले पाहिजे’.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. डी. शिंदे यांनी केले, तर आभार एस. बी. देवरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समिती सदस्य डॉ. के. एस. भावसार, डॉ. ए. एच. साळुंखे, एन. बी. पाटील तसेच डॉ. डी. डी. कर्दपवार यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.