शेतकरी कृती समिती चे प्रयत्नांना यश; प्रशासनाचे पत्र प्राप्त
शेतकरी कृती समिती चे प्रयत्नांना यश….चोपडा येथील रोजच्या काही शेतकऱ्यां चा धरणगाव येथील एका जिन मध्ये कापूस मोजला जाईल. …एस बी नाना पाटील
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ३४००० क्विंटल कापूस घरात पडलेला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे ३० मे रोजी शेतकरी कृती समितीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दुसरे केंद्र सुरू करा अथवा धरणगाव येथील एका जीनवर चोपडा येथील कापूस मोजावा यासाठी निवेदन दिले होते. यासंदर्भात राजकीय नेते, मंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासकीय पातळीवर तहसीलदार, प्रांताधिकारी यांनी जिल्हा सहकार निबंधक राठोड साहेब यांच्याकडे प्रस्ताव पाठवला. यासाठी शेतकरी कृती समितीचे एस. बी. पाटील व बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, पणन संचालक संजय दादा पवार यांनी यांनी सातत्याने पाठपुरावा केला. यानंतर अखेर जिल्हा निबंधक मेघराज राठोड यांनी धरणगाव येथील शगुन जीनमध्ये चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस मोजण्याची परवानगी दिली असून, तसे कागदपत्रे त्यांनी एस. बी. पाटील यांना सुपूर्द केली.
चोपडा बाजार समितीतील प्रतिनिधींना विनंती की, ज्या क्रमाने यादी तहसील, पणन व सहकार विभागाकडे दिली आहे. त्या क्रमानुसारच वाहने सोडली जावीत. कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही नाहीतर शेतकरी कृती समिती रस्त्यावर उतरेल. त्याचबरोबर या निर्णयामुळे कृती समितीचे सर्व पदाधिकारी प्रशासनाचे आभारी असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.