करोनामुळे ऑनलाइन पदग्रहण; सचिवपदी सौ. अंकिता जैन
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) आंतराष्ट्रीय महिला संघटना असलेल्या इनरव्हील क्लब ऑफ चोपडा शाखेच्या नूतन पदाधिकारी व कार्यकारी सदस्यांची निवड नुकतीच घोषित करण्यात आली आहे.
क्लबच्या अध्यक्षपदी सौ. शैला राम सोमाणी तर सचिवपदी सौ. अंकिता जैन यांची निवड करण्यात आली आहे.
कोविड-१९ च्या संकटामुळे क्लबचे ऑनलाइन पद्ग्रहण करण्यात आले. क्लबच्या प्रांत उपाध्यक्ष सौ. अश्विनीबेन गुजराथी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न या कार्यक्रमात नूतन अध्यक्षा सौ. सोमाणी यांना मावळत्या अध्यक्षा सौ. डॉ. कांचन टिल्लू यांनी तर सचिव चेतना बडगुजर यांनी सौ. अंकिता जैन यांना पदभार सोपवला.
याप्रसंगी क्लबचे नूतन पदाधिकारी व कार्यकारी मंडळातील सौ. चंचल जैस्वाल उपाध्यक्ष, सौ. डॉ. कांचन टिल्लू आयपीपी, सौ. नितु अग्रवाल कोषाध्यक्ष, सौ. रुपाली पाटील आयएसओ, सौ. किरण पालिवाल क्लब संवाददाता, सौ. रुपाली काबरा सीसीसीसी, कार्यकारी संचालक सौ. ज्योती वारके, सौ. मंजू अग्रवाल, सौ. लता छाजेड, सौ. खुशबू जैस्वाल, सौ. सीमा पाटील आदींची उपस्थिती होती.

नूतन पदाधिकारी यांना डॉ. कांचन टिल्लू यांनी पदभार सोपवून शुभेच्छा दिल्या.
इनरव्हीलच्या प्रांत उपाध्यक्ष सौ. अश्विनीबेन यांनी नूतन पदाधिकारी व कार्यकारिणीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात.
कोरोना संसर्ग काळात ऑनलाइन उपक्रम राबवतांना आपल्याला समाजात सुदृढ आरोग्यासाठी जनजागृती केली पाहिजे. त्यासाठी महिलांवर मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी अध्यक्ष सौ. सोमाणी व सचिव सौ. जैन यांनी आगामी काळात अनेक समाज उपयोगी व हितकारी उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. प्रारंभी क्लब प्रार्थना होऊन मिटींगला सुरुवात करण्यात आली. आभार प्रदर्शन सचिव सौ. अंकिता जैन यांनी केले.