कोरोनाबाबत घ्यावयाच्या काळजीबद्दल चर्चा
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) येथील चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने कोरोनाच्या काळात प्रथमतःच ऑनलाईन बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीला सुरुवातीला अध्यक्ष श्री व्ही. एच. करोडपती यांनी ऑनलाइन उपस्थित सर्वांचे स्वागत केले, तर सचिव प्रमोद डोंगरे यांनी प्रास्ताविकातून बैठकीची संकल्पना मांडली.
बैठकीत काळासोबत ज्येष्ठ नागरिक यांनीसुद्धा तंत्रज्ञान व आधुनिकतेचा अवलंब करीत या बैठकीचा उद्देश विषद केला. बैठकीत कोरोना काळातील अनुभवांची चर्चा व आगामी काळात घ्यावयाची काळजी यावर उपस्थितांनी आपले दिलखुलास मनोगत व्यक्त केले.
बैठकीत फेसकोमचे माजी प्रदेशाध्यक्ष श्री. डी. टी. चौधरी, अ. भा. जॉईंट सेक्रेटरी जगदीश जाझरिया, ऐनपूर ज्येष्ठ नागरिक संघाचे श्री पंडितराव पाटील सर, यावलचे श्री बाळकृष्ण वाणी, प्रा. श्यामभाई गुजराथी, जयदेव देशमुख आदी मान्यवरांनी सहभाग घेतला. बैठकीचे सूत्रसंचलन ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार पालिवाल यांनी केले, तर आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष सुभाष पाटील यांनी केले.
कोरोना काळात नियम पालन करीत आपण जगले पाहिजे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपल्या दैनंदिन जीवनातील व्यवहार पार पाडले तर कोणत्याही परिस्थितीत आपण सर्व समस्येवर मात करू शकतो, असे मनोगत उपस्थित सर्वच वक्त्यांनी व्यक्त केले.