• Wed. Feb 4th, 2026

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) चोपडा नगरपरिषदेच्या स्थायी व विषय समित्यांची  सभापती पदांची निवड पीठासन अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच होऊन स्थायी समिती सभापतीपदी नगराध्यक्ष सौ नम्रता सचिन पाटील यांची तर बांधकाम समिती सभापती पदी हुसेन खाँ अय्युब खॉं पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तसेच इतर समिती सभापतींची ही निवड घोषित करण्यात आली आहे.


नगरपालिका सभागृहात सकाळी 11 वाजता पीठासन अधिकारी  तहसीलदार भाऊसाहेब राऊत यांच्या कडे स्थायी व विशेष समिती सभापतींचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रत्येकी एकच आल्याने बिनविरोध स्थायी समिती सभापतीपदी सौ नम्रता ताई सचिन पाटील तर बांधकाम सभापतीपदी हुसेन खाँ अय्युब खॉं पठाण, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती पदी अमोल साहेबराव पाटील, स्वच्छता वैद्यक आणि आरोग्य समिती सभापतीपदी रमेश ग्यानोबा  शिंदे, पाणीपुरवठा व जल निस्सारण समिती सभापतीपदी किशोर रघुनाथ चौधरी, नियोजन व विकास समिती सभापतीपदी उपनगराध्यक्ष पंकज सुरेश बोरोले आणि महिला व बालकल्याण समिती सभापती पदी सौ. देवयानी पवन माळी यांची  निवड करण्यात आली आहे.

यावेळी सौ नम्रता सचिन पाटील उपाध्यक्ष पंकज सुरेश बोरोले गटनेता योगेश उर्फ पियुष राजेंद्र चौधरी,गटनेते रमाकांत नथू ठाकूर,गटनेते गजेंद्र अरविंद जैस्वाल,गटनेते हितेंद्र रमेश देशमुख यांच्यासह 34 सदस्य हजर होते. तसेच मुख्याधिकारी रामनिवास झवंर, उप मुख्याधिकारी संजय मिसर, सभा अधीक्षक संजय ढमाळ, अनिल चौधरी तसेच सर्व विभाग प्रमुख व नगरसेवक मोठ्या संख्येने हजर होते.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.