• Sat. Jul 5th, 2025

आदिवासी महिलांना रोटरी क्लब ऑफ चोपडाने दिली जीवन संजीवनी

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) समाज विकासाच्या कामात रोटरी क्लब ऑफ चोपडाचे योगदान मोठे आहे. शिक्षण, आरोग्य, कृषी, सामाजिक, कला, जलसंवर्धन या विविध क्षेत्रात केलेले कार्य विशेष वाखाणण्याजोगे आहे. तळागळातील समाजासाठी रोटरीतर्फे राबविण्यात येत असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. चोपडा रोटरी ही सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी शाखा असल्याचे प्रतिपादन प्रांतपाल रोटे. रमेश मेहेर यांनी केले. ते रोटरी क्लब चोपडातर्फे तालुक्यातील आदिवासी भागातील सत्रासेन येथे आयोजित जीवन संजीवनी कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
 

या वेळी मंचावर रोटे. राजेश मोर ( असि. गव्हर्नर), रोटे. एम डब्ल्यू पाटील (एनक्लेव चेअर), ज्योतीताई पाटील (सभापती - महिला व बालकल्याण विभाग जळगाव), ज्ञानेश्वर भादले (उपाध्यक्ष - धनाजी नाना चौधरी आश्रम शाळा सत्रासेन), रवींद्र भादले (अध्यक्ष - धनाजी नाना चौधरी आश्रम शाळा सत्रासेन), डॉ. दिनेश निळे (आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र लासुर), नरेश शहा (डिस्ट्रिक्ट ट्रेनर), ओंकार महाले (नाशिक), नीलेश कोटेचा, डॉ. पराग पाटील, डॉ. नीता जयस्वाल, डॉ. सौ. प्राजक्ता भामरे, डॉ. अमोल पाटील, डॉ. प्रफुल्ल पाटील, सौ. वंदना भादले, चोपडा रोटरी क्लब ऑफचे अध्यक्ष रोटे पंकज बोरोले, मानद सचिव रोटे प्रवीण मिस्तरी, खजिनदार रोटे. भालचंद्र पवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 
 सविस्तर वृत्त असे की, रोटरी क्लब चोपडातर्फे तालुक्यातील आदिवासी गाव सत्रासेन येथे गरोदर महिला व स्तनदा मातांसाठी तसेच बाल रुग्णांसाठी जीवन संजीवनी कार्यक्रमांतर्गत महिला व बाल रुग्ण तपासणी व मोफत औषधे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात गरोदर महिला, स्तनदा माता, बालक इत्यादींची तपासणी करण्यात आली. त्यासाठी बालरोग विभाग, स्त्री रोग विभाग, त्वचा रोग विभाग, जनरल विभाग, रक्त तपासणी विभाग, मोफत औषधे वाटप विभाग इत्यादी कक्षांची उभारणी करण्यात आली होती.
 सदर शिबिराविषयी आदिवासी महिलांमध्ये जाणीव जागृतीचे कार्य गावातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महिलांनी केले. सदर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
 रोटे राजेश मोर (असि. गव्हर्नर) आपल्या मनोगतात म्हणाले की, चोपडा रोटरीचे कार्य नेहमीच उल्लेखनीय राहिले आहे. चोपडा रोटरीचे आमंत्रण आल्यावर खूप मनस्वी आनंद होतो. रोटरी क्लब चोपडा सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. आज आदिवासी भागातील महिलांसाठी जे शिबिर आयोजित केले ते अत्यंत उल्लेखनीय असल्याचे ते म्हणाले. उत्कृष्ट कार्य करीत असताना जे आत्मिक समाधान मिळते, त्याचे मोल करता येत नाही, असे सांगत रोटरी क्लब चोपडाच्या पुढील वाटचालीस त्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. 
चोपडा रोटरी क्लबचे कौतुक
कार्यक्रमाच्या सुरुवातीला धनाजी नाना चौधरी आश्रम शाळेच्या विद्यार्थिनींनी आदिवासींच्या वेशभूषेत आदिवासी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. महिला व बाल रुग्ण तपासणी व मोफत औषधे वाटप शिबिराचे उद्घाटन प्रांतपाल रोटे रमेश मेहेर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रांतपाल रोटे रमेश मेहेर व असि. गव्हर्नर रोटे राजेश मोर यांनी शिबिराच्या विविध कक्षाची पाहणी केली. शिबिराचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल चोपडा रोटरीचे कौतुक केले.
 सर्व पदाधिकाऱ्यांचे परिश्रम
 शिबीर यशस्वीतेसाठी अध्यक्ष रोटे. पंकज बोरोले, मानद सचिव रोटे. प्रवीण मिस्त्री, खजिनदार रोटे. भालचंद्र पवार, प्रकल्पप्रमुख रोटे. महेंद्र बोरसे, सहप्रकल्प प्रमुख पृथ्वीराज राजपूत, विजय पाटील यांनी परिश्रम घेतले.सदर शिबिरासाठी धिरेंद्र जैन, प्रसन्न गुजराथी, डॉ. शेखर वारके, नितीन अहिरराव, ॲड. रुपेश पाटील, विलास कोष्टी, टाटीया आदी रोटेरीयन उपस्थित होते.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र बोरसे यांनी केले. तर  सूत्रसंचालन योगेश चौधरी यांनी केले.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.