• Fri. Jul 4th, 2025

चोपडा रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी नितीन अहिरराव;
१० जुलैला ऑनलाइन पदग्रहण

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) पन्नास वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या शहरातील रोटरी क्लब ऑफ चोपडाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या (२०२०-२१) अध्यक्षपदी उद्योजक नितीन अहिरराव यांची तर मानद सचिवपदी अॅड. रुपेश पाटील यांची निवड झाली आहे.

सन २०१३ पासून नितीन अहिरराव रोटरीत सक्रीय असून, त्यांनी विविध कमिटीवर चेअरमनपदी तसेच रोटरीच्या उपाध्यक्षपदी काम केले आहे. विशेष म्हणजे, चोपड्यात गेल्यावर्षी झालेल्या रोटरी महोत्सवाचे यशस्वी आयोजन त्यांच्या चेअरमनशिपमध्ये घेण्यात आले होते. नक्षत्र ज्वेलर्सचे संचालक म्हणून ते सराफबाजारात कार्यरत आहेत. रुपेश पाटील ग्रीन ग्लोब बायोटेक्नॉलॉजी कंपनीचे संचालक असून, ते चोपडा साखर कारखान्याचे माजी चेअरमन अॅड. घनश्‍याम निंबाजी पाटील यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी क्लबमध्ये विविध कमिट्यांवर जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

नूतन अध्यक्ष नितीन अहिरराव यांनी कार्यकारिणीची घोषणा केली असून त्यात कोषाध्यक्ष – अर्पित अग्रवाल, उपाध्यक्ष – पंकज बोरोले, सार्जंट अॅट आर्मस – भालचंद्र पवार आहेत. इतर समित्यांच्या चेअरमनपदी अशिष गुजराथी, संजीव गुजराथी, अविनाश पाटील, प्रसन्न गुजराथी, डॉ. नीता जैस्वाल, विलास एस. पाटील तर क्लब ट्रेनर म्हणून एम. डब्ल्यू. पाटील तसेच सल्लागार समितीमध्ये डॉ. शेखर वारके, अॅड. अशोक जैन व इतर समित्यांमध्ये बाकी सदस्यांच्या समावेश आहे.

रुपेश पाटील

करोना संसर्गच्या पाश्र्वभूमीवर रोटरी क्लबच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा येत्या, १० जुलै रोजी ऑनलाइन पध्दतीने होणार असल्याची माहिती क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.