चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) चोपडा येथे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. तंत्रनिकेतन व्यवस्थापनाने नुकतीच याबाबतची माहिती एका पत्रकार परिषदेत दिली.
AICTE, DTE, MSBTE मान्यताप्राप्त तंत्रनिकेतन ची स्थापना 1983 साली झाली. अक्कासाहेब श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील ह्या महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्री असताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात तंत्र शिक्षणाचा फायदा तळागाळातील विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून खासगी संस्थांना तंत्रनिकेतन कॉलेज सुरू करण्याची परवानगी दिली त्यात हे तंत्रनिकेतनसुद्धा होते. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले हे तंत्रनिकेतन येथील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांसाठी गेल्या ३५ वर्षांपासून कार्यरत आहे.
आजपर्यंत या तंत्रनिकेतनमधून जवळपास अकरा हजार विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण घेतले आहे. त्यात साडेसात हजार मुले व साडेतीन हजार मुलींनी शिक्षण घेतले. यातील काही विद्यार्थी परदेशात कंपन्यांमध्ये काम करीत आहेत, तर काही विद्यार्थी भारतातील नामवंत कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. तसेच काही विद्यार्थी सरकारी नोकरी करीत आहेत.
सदरच्या तंत्रनिकेतनमध्ये अनुभवी शिक्षक वृंद असून, सुसज्ज लॅब्स व भव्य ग्रंथालय आहे. या तंत्रनिकेतनमध्ये पुढील कोर्सचे शिक्षण सुरू आहे.
क्र. …………..कोर्सेस ………………. प्रवेश क्षमता
१. Civil Engineering ………………….. ६०
२. Computer Engineering …………. ६०
३. Electrical Engineering ………….. ६०
४. Mechanical Engineering ……….. ६०
शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी तंत्रनिकेतन ची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी सुविधा केंद्र (F.C) लवकरच संस्थेत सुरू होणार आहे तसेच प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार फी सवलतीचा लाभ घेता येईल.
पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील व संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील, प्राचार्य श्री व्ही. एन .बोरसे, उपप्राचार्य एन. आर. शिंदे व शिक्षक वृंद उपस्थित होते.