चोपडा (साथीदार वृत्तसेवा) तालुका व्यसनमुक्ती समितीची पहिली बैठक आमदार लताताई सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार अनिल गावीत, बीडीओ बी. एस. कोसोदे, नायब तहसीलदार राजेश पऊळ यांच्या उपस्थितीत पार पडली. या वेळी तहसीलदार गावीत साहेब यांनी व्यसनमुक्तीसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना व पुढील काळात या समितीतर्फे घेण्यात येणारे उपक्रम आणि व्यसनमुक्ती समितीचे कार्य सविस्तर समजावून सांगितले.
त्यानंतर नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांचा परिचय व स्वागत करण्यात आले. या वेळी प्रवीण सोनवणे, राजेंद्र पाटील, किशोर कोळी, श्यामकांत पाटील, हभप गजानन पाटील, वासुदेव महाजन, गोविंदा कोळी, जनाबाई माळी, अनिल पाटील, दिव्यांक सावंत, नंदू गवळी, गिता ठाकरे, कविता कोळी, अंजना माळी, सुरेश ढिवरे आदी सदस्य उपस्थित होते.