• Sat. Jul 5th, 2025

धुळे (साथीदार वृत्तसेवा) विशाल खान्देशचे नेते, माजी मंत्री, खान्देश भूषण दाजीसाहेब रोहिदास पाटील यांचे दि. २७ सप्टेंबर २०२४, शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या, शनिवार दि. २८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता नेहरू हौसिंग सोसायटी, देवपूर, धुळे येथील निवासस्थानापासून निघेल. शहरातील एसएसव्हीपीएस कॉलेज ग्राउंडवर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

अंत्यदर्शन शनिवार, दि २८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत नेहरू हौसिंग सोसायटी, देवपूर, धुळे येथील सुंदर सावित्री सभागृहात घेता येईल.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.