चोपड्यातील गंभीर घटना; पोलिसांत गुन्हा दाखल
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील नागलवाडी रस्त्यावरील फुले नगरात रविवार सायंकाळी सहा वाजता पती पत्नीच्या भांडणात पती संजय पूंजू चव्हाण याने आपल्या पत्नीला गुढग्यावर विळ्याने जबरदस्त वार करून ठार केले. पत्नी सौ. मीराबाई (४०) हिला जखमी अवस्थेत दवाखान्यात नेत असतानाच रक्तस्राव झाल्याने मीराबाईने रस्त्यावर प्राण सोडले.
याप्रकरणी चोपडा शहर पोलिसांनी आरोपी संजय विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोनि अवतारसिंह चव्हाण, सपोनि अजित सावळे करीत आहेत.