जळगावात ३५ गुन्हे दाखल
मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. राज्यात सायबर संदर्भात ५१५ गुन्हे दाखल झाले असून २७३ व्यक्तींना अटक केली आहे.अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ५१५ गुन्ह्यांची (ज्यापैकी ३९ N.C. आहेत) नोंद १ जुलै २०२० पर्यंत झाली आहे. या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा पुढील गोष्टी निदर्शनास आल्या.
- आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १९७ गुन्हे दाखल झाले आहेत.
- आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी २१४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
- टिकटॉक विडिओ शेअर प्रकरणी २८ गुन्हे दाखल झाले आहेत.
- ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी ११ गुन्हे दाखल झाले आहेत.
- इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत.
- अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, Youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ६१ गुन्हे दाखल झाले आहेत.
- यामध्ये आतापर्यंत २७३ आरोपींना अटक केली आहे, तर यापैकी १०८ आक्षेपार्ह पोस्ट्स टेकडाऊन करण्यात यश आले आहेत.
जळगावात ३५ गुन्ह्याची नोंद
जळगाव जिल्ह्यातील बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील नोंदणीकृत गुन्ह्यांची संख्या ३५ वर गेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट शेयर केली होती व त्यामुळे परिसरातील शांतता भंग होऊन, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.
कोरोनासंदर्भात चुकीची माहिती सावध असावे
सध्याच्या काळात फेसबुक, व्हाट्सअँप इत्यादी सोशल मिडियावर कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, अनेकजण वेगळे उपचार आपल्या भारतीय इतिहासात सांगितले आहेत करून ,चुकीची माहिती असणारे मेसेजेस व पोस्ट्स फॉरवर्ड किंवा शेअर करत आहेत.
महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते की, कृपया कोणीही अशा मेसेज व पोस्टवर विश्वास ठेवून स्वतःवर किंवा आपल्या घरातील इतरांवर कोणतेही प्रयोग करू नका. तसेच अशा मेसेज मधील माहितीची खातरजमा तज्ज्ञ डॉक्टरांकडून करून घ्या. असे मेसेज फॉरवर्ड करू नये, कारण खोटी माहिती व अफवा पसरविणे कायद्याने गुन्हा आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागामार्फत देण्यात आली आहे.