दैनिक राशिमंथन, १७ जून २०२० बुधवार
*मेष राशी
महत्त्वाची कामं कोणाच्याही सहकार्याशिवाय हाताळू शकाल असे जर तुम्हाला वाटत असेल. तरीही वरिष्ठांचा सल्ला घ्या. कुटुंबातील लोकांच्या भावना जाणून घ्या. आनंदाचे क्षण अनुभवा.
*वृषभ राशी
आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत नविन कामासाठी चर्चा करू शकतात. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूड मुळे आपल्या सभोवतालच्या सर्वाना आनंद आणि सुख लाभेल. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्ही काहीतरी खास करणार आहात. सकारात्मक विचाराने आजच त्या दिशेने प्रयत्न सुरू करा.
*मिथुन राशी
वरिष्ठांच्या सल्ल्याला आयुष्यात महत्व देऊ शकतात. इतरांवर खर्च करणे टाळा. लोकांच्या भाऊगर्दीमध्ये तुम्ही नशीबवान आहात. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या.
*कर्क राशी
वर्तमानात राहा. शांत राहण्याचा प्रयत्न करा. जर प्रवास करत असाल तर आपल्या महत्वाच्या वस्तूंची काळजी घ्या. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत. उद्यमशील लोकांसोबत भागीदारी कराल. या राशीतील लोकांना आजच्या दिवशी आपल्यासाठी वेळ काढण्याची अधिक आवश्यकता आहे.
*सिंह राशी
आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल. आपल्या भागीदारांना गृहीत धरू नका. पैसा, प्रेम, कुटुंब यापासून दूर होऊन आज तुम्ही आनंदाच्या शोधात कुठल्या आध्यत्मिकतेमध्ये जाऊ शकतात.
*कन्या राशी
तुम्हाला आज धन लाभ होण्याची शक्यता आहे. खाजगी घडामोडी संपूर्ण नियंत्रणाखाली राहतील. आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षिसही मिळेल. तुमचा रिकामा वेळ आज मोबाइल आणि टीव्ही पाहण्यात खर्च होऊ शकतो.
*तुला राशी
विचारांमध्ये सकारात्मकता ठेवा. ध्यानयोग करण्यासाठी प्राधान्य द्या. नेहमीपेक्षा आज तुम्ही उच्च लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न कराल – अपेक्षित निकाल मिळाला नाही तरी नाराज होऊ नका. आजच्या दिवशी आपल्याला काय वाटते हे दुस-यांना कळावे अशी इच्छा बाळगू नका. यशाचे चांगले परिणाम तुम्हाला माहीतच असतील.
*वृश्चिक राशी
आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात. तुम्ही शांतपणे सर्व घटनांचा विचार करून परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवाल. त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. तुमच्या मैत्रीमधील चांगला काळ आठवा आणि त्या आठवणींना उजाळा देऊन नव्याने मैत्रीपूर्ण वाटचाल करा. व्यावसायिक अडचणीवर मात करण्यासाठी तुमची कौशल्ये वापरा.
*धनु राशी
दूरवर राहणा-या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरेल. लग्न ठरलेल्या व्यक्तींना त्यांचा जोडीदार हा मोठ्या आनंदाचा स्त्रोत आहे याचा अनुभव मिळेल. रोजच्यापेक्षा आज तुमचे सहकारी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेतील. वेळ भरभर निघून जाते म्हणून, आज पासूनच आपल्या किमती वेळेचा योग्य वापर करा.
*मकर राशी
मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल. आज धार्मिक कामात तुम्ही आपला रिकामा वेळ घालवण्याचा विचार करू शकतात. या वेळात विनाकारण वादात तुम्ही पडू नका.
*कुंभ राशी
आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हे ध्यानात ठेवा. महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठभेट होईल. आज सकाळी तुम्हाला अशी काहीतरी गोष्ट मिळेल, ज्याने तुमचा दिवस आनंदी होऊन जाईल.
*मीन राशी
योगसाधना करा. त्यामुळे तुम्हाला जीवनाचा आनंद शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक पद्धतीने कसा घ्यावा हे शिकता येईल. तुमचे जोडीदार/भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. तुम्हाला जिथे बोलण्याची गरज नाही तिथे तुम्ही बोलू नका.