माजी आमदार चंद्रकांत अण्णासाहेब सोनवणे यांचे स्वप्नं पूर्णत्वाकडे..!
चोपडा दि.२६(साथीदार वृत्तसेवा) सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातुन मंजुर झालेले विकासकामांचा भुमिपुजन सोहळा नुकताच पार पडला.
शनिवार, दि. 28 ऑगस्ट 2021रोजी डांभूर्णी ता.यावल येथे सकाळी 9.00 वाजता भूूमीपूजन सोहळा झाला.
कार्यक्रमाचे भुमीपुजन शुभहस्ते सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांचे हस्ते झाला, तर आण्णासो. प्रा. श्री. चंद्रकांत बळीराम सोनवणे (माजी आमदार, चोपडा विधानसभा) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
नशनल हायवे पहूर, जळगांव, इंदौर, किनगांव, लंगडा आंबा, रस्ता रामा ४२ कि.मी.५३/४०० ते ५९/०० (भाग विदगांव ते डांभूर्णी) ची रुंदीकरणासह सुधारणा करणेसाठी जवळपास
अंदाजित रक्कम : २८० लक्ष (२ कोटी, ८० लाख रुपये) एव्हढा मोठा निधी मंजूर झाला आहे तसेच पहूर, जळगांव, किनगांव, लंगडा आंबा, रस्ता रामा ४२ वरील डांभूर्णी गावातील लांबी काँक्रीटीकरण करणेकामी अंदाजित रक्कम : ५६ लक्ष (५६ लाख रुपये) रुपयांचा निधी आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून मिळाला.