• Fri. Jul 4th, 2025

पेण तालुक्यात विविध विकासकामांचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन

अलिबाग (जिमाका) पेण तालुक्यातील ग्रामपंचायत डोलवी येथे व्यायामशाळा भूमीपूजन, आर-ओ फिल्टर प्लांटचे उद्घाटन व ग्रामपंचायत डोलवी व एम.जी.एम. हॉस्पिटल कामोठे यांच्या सौजन्याने आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते आज संपन्न झाले.
तसेच ग्रुप ग्रामपंचायत वडखळ येथे ग्रामपंचायत निधीतून बांधण्यात आलेल्या आधारकेंद्राचे तसेच जिल्हा नियोजन समितीमार्फत नागरी सुविधा योजनेतून बांधलेल्या अभ्यास केंद्राचे उद्घाटन आणि आठवडा बाजाराचे सुशोभिकरण या ग्रामपंचायतहद्दीतील विकासकामांचेही उद्घाटन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, पंचायत समिती सदस्य प्रदीप म्हात्रे, पेण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पेण तहसिलदार डॉ.अरुणा जाधव, डोलवीच्या सरपंच श्रीमती वनिता म्हात्रे, वडखळ सरपंच राजेश मोकल, गडब सरपंच अपर्णा कोठेकर, शहाबाद सरपंच धनंजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.