धरणगाव – (साथीदार वृत्तसेवा) येथील कोविड़ सेंटर मधुन सात रुग्ण कोरोना मुक्त झाले. या सर्वांचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी पुष्प देऊन स्वागत केले. तसेच त्यांच्या मनात कोणताही नकारात्मक विचार येऊ नये, स्वतः विषयी काही कमतरता वाटू नये व आत्मविश्वास वाढावा म्हणून सर्वांसोबत चर्चा केली आणि त्यांना घरी रवाना केले.
या प्रसंगी नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड, भाजपा नेते शिरीषआप्पा बयस, पुनिलाल आप्पा महाजन, ऍड. वसंतराव भोलाने, मधुकर रोकड़े, कडूआप्पा बयस, गुलाबराव मराठे, ललित येवले, दिलीप महाजन, टोनी महाजन, सुनील चौधरी, कन्हैया रायपुरकर, जितू चौधरी, तोडे भाऊसाहेब उपस्थित होते.
