• Fri. Jul 4th, 2025

इतिहास संकलन संस्था महाराष्ट्रच्या देवगिरी प्रांताच्या महिला प्रमुख पदावर चोपड्याच्या प्रा. डॉ. मोहिनी उपासनी

चोपडा (प्रतिनिधी) येथील समाजकार्य महाविद्यालयाच्या अध्यापक प्रा. डॉ. मोहिनी उपासनी यांची अखिल भारतीय इतिहास संकलन योजना नवी दिल्ली संलग्नित इतिहास संकलन संस्था महाराष्ट्रच्या देवगिरी प्रांताच्या सह महिलाप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. इतिहास संकलनात महिला सहभाग व संघटनात्मक जवाबदारी त्यांना देण्यात आली आहे.



करमाळा (बीड) येथील राजीव गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अखिल भारतीय इतिहास संकलन योजना नवीदिल्ली व इतिहास संकलन संस्था, महाराष्ट्र यांनी आयोजित केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळा व देवगिरी प्रांत सर्वसाधारण सभेत प्रा. डॉ. उपासनी यांची नियुक्तीची घोषणा व सत्कार करण्यात आला.

यावेळी या संस्थांशी निगडीत पदाधिकारी, मार्गदर्शक व कार्यकर्ते उपस्थित होते.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.