• Fri. Jul 4th, 2025

माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची पुण्यतिथी चोपडा काँग्रेसच्या वतीने विनम्र अभिवादन

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात दिनांक 21 मे 2025 रोजी सकाळी 09:30 वाजता भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची पुण्यतिथी चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन कार्यक्रम करण्यात आला. 

यावेळी राजीव गांधी यांनी केलेल्या विज्ञान तंत्रज्ञान 18 वर्षाच्या तरुणांना मतदानाचा अधिकार इत्यादी अनेक बाबींची कार्यकर्त्यांना जाणीव करून देण्यात आली.

यावेळी तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे, शहराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक नंदकिशोर सांगोरे, माजी शहराध्यक्ष तथा सूतगिरणी संचालक के. डी. चौधरी सर, सूतगिरणी संचालक अँड. एस. डी. पाटील, विक्रम पाटील सर, रमाकांत सोनवणे, मोहन देवराम पाटील, शेख आरिफ शेख सिद्दीकी, सूतगिरणी संचालक वजाहत अली काझी, शांताराम नाना लोहार, एस. एल. पाटील सर, किसान सेलचे तालुकाध्यक्ष शशिकांत साळुंखे सह कार्यकर्ते उपस्थित होते..

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.