आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नांना यश
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणार्या कोविड संशयीत रुग्णांना चांगल्या दर्जाची सेवा मिळावी यासाठी, चोपडा उपजिल्हा रुग्णालयासाठी पुरेशा प्रमाणात व्हेंटिलेटर पुरवावे, अशी मागणी आमदार लताताई सोनवणे यांनी वेळो वेळी शासनाकडे केली होती. त्यानुसार चोपडा उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी राज्य सरकारने दिलेले १५ व्हेंटिलेटर आज, ३ जुलै चोपडा उपजिल्हा रुग्णालयास प्राप्त झाले.
याप्रसंगी आमदार लताताई सोनवणे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते हे व्हेंटिलेटर चोपडा उपजिल्हा रुग्णालयाकडे सुपुर्द करण्यात आले. व्हेंटीलेटर प्राप्त झाल्याने आता चोपडा येथे कोविडच्या गंभीर रुग्णांना आता चांगल्याप्रकारे आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे. यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या वेळी राजेंद्र पाटील, तालुकाप्रमुख हरिष पाटील, जि प सदस्य एम. व्ही. पाटील, उपसभापती अॅड. एस. डी. सोनवणे, तहसीलदार अनिल गावित, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डाॅ. मनोज पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रदीप लासुरकर, गटविकास अधिकारी बी. एस. कोसोदे, पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर, विधानसभा क्षेत्र प्रमुख विकास पाटील, नगरसेवक महेंद्र धनगर, सुकलाल कोळी तालुका संघटक दीपक चौधरी, युवासेना उपजिल्हा प्रमुख गोपाल चौधरी, युवासेना तालुकाप्रमुख सुनील पाटील, रमेश आण्णा आदी उपस्थित होते.