चोपडा (साथीदार वृत्तसेवा) चोपडा तालुक्यातील अनवर्दे खुर्द येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते आदिवासी सेवक संजीव पांडुरंग शिरसाठ यांच्या पत्नी माजी सरपंच सौ. सविताबाई संजीव शिरसाठ यांचे आज दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री १०:२५ वाजता अपघाती मृत्यू झाला. या घटनेचे वृत्त गावभर पसरताच सर्वत्र शोककळा पसरली.
सविताबाई शिरसाठ ह्या घटस्थापनेच्या प्रथम दिवशी सप्तश्रृंगी गडावर देवी दर्शनासाठी जायला निघाल्या असतांना नाशिक येथील तात्पुरत्या निवासाजवळून अवघ्या हाकेच्याअंतरावर असलेल्या जत्रा हॉटेलजवळील मार्गावरून जात असताना कमकुवत कामाचे लेअर खचल्याने मोटार सायकलवरून पडून मेंदूला जबर दुखापत झाली. नाकातून व तोंडातून व कानातून अति रक्तस्राव होत असल्याने तत्काळ लोकमान्य हॉस्पिटलला उपचारार्थ दाखल करण्यात आले. जवळपास तीन दिवस मृत्यूशी झुंज देत असतांना आज प्राणज्योत मालवली. त्या पत्रकार महेश शिरसाठ व कैलास शिरसाठ यांच्या भावजयी असून, त्यांच्या पश्चात इंजि. पवन व इंजि. अनुष्का ही दोन मुले आहेत.