कोळी जमातीसाठी सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन : जगन्नाथ बाविस्कर
चोपडा (प्रतिनिधी) सालाबादप्रमाणे यावर्षीही जळगाव येथे कोळी समाज बहुउद्देशीय मित्रमंडळातर्फे दिनांक ४ मे रोजी कोळी लोकांच्या विवाहेच्छुक उपवर-वधूंसाठी दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने जोडप्यांकडून एकही रुपया न घेता संपूर्ण मोफत सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याबाबतच्या प्रचार प्रसारासाठी चोपडा येथे म. वाल्मिकी नगरात बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी रंगराव देवराज हे होते. प्रमुख अतिथी म्हणून जळगावचे माजी नगराध्यक्ष चत्रभुज सोनवणे, ज्येष्ठ समाजसेवक लखिचंद बाविस्कर, मंडळाचे अध्यक्ष गोकुळ सूर्यवंशी, शांताराम सपकाळे, तातेश कोळी अकोला यांची उपस्थिती होती. प्रारंभी म.वाल्मिकींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक मंडळाचे तालुका प्रतिनिधी व माजी डीवायएसपी छगनराव देवराज यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते भाईदास कोळी, तातेश कोळी, अनिल बाविस्कर यांनीही मनोगत व्यक्त केले. मंडळाचे मार्गदर्शक व आंदोलनकर्ते जगन्नाथ बाविस्कर यांनी विवाह सोहळ्याबाबत सविस्तर माहिती दिली. प्रेरक चत्रभुज सोनवणे व अध्यक्ष रंगराव देवराज यांनी आपल्या भाषणात गरजु समाजबांधवांनी या मोफत सामूहिक विवाह सोहळ्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले.
याप्रसंगी मंडळाचे सचिव अनिल कोळी, सदस्य गणेश बाविस्कर, सुधाकर बाविस्कर, दीपक कोळी, रवींद्र कोळी, संजय बाविस्कर, आनंद कोळी, रतन बिरहाडे, हिरालाल ठाकरे यांचेसह भरत बाविस्कर, सुभाष रायसिंग, मधुसूदन बाविस्कर, माधवराव देवराज, गोपाल कोळी, संतोष देवराज, भागवत कोळी, देवीदास देवराज, नवल कोळी, भरत पाटील विदगावकर, मोतीलाल रायसिंग, भगवान बाविस्कर, सुकलाल कोळी, प्रकाश सपकाळे, प्रवीण कोळी ठाणेकर, योगेश बाविस्कर, भाऊसाहेब बाविस्कर, वसंत कोळी, सुधाकर कोळी, आधार कोळी, किशोर देवराज, लीलाधर बाविस्कर, संतोष कोळी, गुलाब कोळी यांचेसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभारप्रदर्शन प्रेमनाथ बाविस्कर यांनी केले.
वर-वधुंकडून एक रुपयाही न घेता संपूर्ण मोफत होणार शुभविवाह
