• Sat. Jul 5th, 2025

ग्राहक पंचायतीच्या जिल्हाध्यक्षपदी मनोज जैन

जळगाव जिल्ह्याची ऑनलाइन बैठकीत जिल्हा कार्यकारिणी घोषित

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) ग्राहक पंचायत महाराष्ट्र, जळगाव जिल्हाची ऑनलाइन मिटिंग रविवार दि. ३० ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ४.०० वाजता ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे अध्यक्ष मा. डॉ. विजयजी लाड यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सर्वप्रथम नाशिक विभाग सहसचिव अँड. सुरेंद्र सोनवणे यांनी उपस्थितांचे स्वागत करून मिटिंगच्या आयोजनाबद्दल माहिती दिली. यानंतर सदर मिटिंगचे प्रास्ताविक माजी जिल्हाध्यक्ष श्री. प्र. ह. दलाल सर यांनी केले, आपल्या प्रास्ताविकात दलाल यांनी सर्वांचे स्वागत करून आणि जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यासाठी विभागाने आयोजित केलेल्या या बैठकीला राज्याचे अध्यक्ष आदरणीय डॉ. विजयजी लाड, नाशिक विभागाध्यक्ष आदरणीय श्री. बाबासाहेब जोशी, नाशिक विभागाचे संघटक आदरणीय श्री. अरुणजी भार्गवे हे आवर्जून उपस्थित असल्याबद्दल त्या सर्वांचे सहर्ष स्वागत करून आभारही व्यक्त केले. नाशिक विभाग संघटक श्री. अरुण भार्गवे यांनी त्यानंतर सभेचे प्रयोजन स्पष्ट आपली ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही संघटना निती आयोग नोंदणीकृत संघटना तर आहे, शिवाय भारत सरकारने सन 2017 मध्ये राजपत्रातून आपल्या संघटनेला मान्यताप्राप्त उपभोक्ता संघटना म्हणून मान्यताही दिलेली आहे. याशिवाय मुंबई विश्वस्त संस्था कायद्यान्वये आपली संघटना नोंदणीकृत संघटना असल्याने आपणास भारत मानक ब्यूरो शासकीय परिषदेत सदस्यत्वाचा मानही मिळालेला आहे हे स्पष्ट करून अशी आपली एकमेव ग्राहक संघटना असल्याचे सांगितले. आपण सर्वांनी परमपूज्य नानासाहेब स्व.बिंदुमाधव जोशी यांनी दर्शविलेल्या मार्गावर निष्ठेने व प्रामाणिकपणे ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहनही त्यांनी केले. तालुका स्तरावरील समस्या तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी सोडविण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी आवश्यक असेल तर जिल्हा पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घ्यावे, तरीही समस्या न सुटल्यास जिल्ह्याकडे सोपवावी, जिल्ह्यानेही तसाच प्रयत्न करावा प्रसंगी विभागाचे मार्गदर्शन घ्यावे, आणि तरीही न सुटल्यास विभागाकडे पाठवावी. समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रथम आपला अभ्यास असावा. ग्राहक कायद्याचे यथोचित ज्ञान आपणास असायलाच पाहिजे असेही त्यांनी आवर्जून सांगितले. यापुढे सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचे रेकॉर्ड ठेवावे आणि आपल्या कामाचा पुराव्यासह अहवाल जिल्हाध्यक्ष व जिल्हा संघटक यांच्याकडे नियमित सादर करावा. सदर अहवाल जिल्हा विभागाला पाठवेल त्याप्रमाणे हा अहवाल सादर करेल अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार जिल्हाध्यक्ष व जिल्हा संघटक यांनीच करावयाचा आहे. कार्यकर्त्यांनी व तालुका पदाधिकाऱ्यांनी आपल्या सूचना जिल्ह्याला कळवाव्यात मात्र त्यांनी अधिकाऱ्यांशी परस्पर पत्रव्यवहार करू नये असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपापसातील मतभेद मिटवून एकोप्याने सामंजस्याने कार्यरत राहून जिल्ह्याचे काम विभागात सर्वश्रेष्ठ ठरेल, असे प्रयत्न करावे असे सांगून सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्यात. नाशिक विभागाचे अध्यक्ष आदरणीय श्री. बाबासाहेब जोशी यांनी सर्व प्रथम सदरच्या ऑनलाईन मिटिंगसाठी शुभेच्छा देवून ऑनलाईन मिटींग नियमित आयोजित कराव्यात असे सांगितले, तसेच संघटनेचे व्रत आणि पावित्र्य जपावे, संघटनेची कीर्ती वाढवावी, ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी अभ्यासू वृत्ती जोपासावी, संघटनेचे ध्येय आणि कार्यपद्धती याबाबतही ही संक्षिप्त खुलासा केला. यावेळी जळगाव जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

जळगाव जिल्हा कार्यकारिणी :

जिल्हाध्यक्ष- श्री. मनोज जैन,
उपाध्यक्ष १ – श्री. सतीश गडे,
उपाध्यक्ष २ – डॉ. अविनाश सोनगिरे,
संघटक – श्री. प्रकाश. ह. दलाल,
सह संघटक १ – सौ. उज्वला देशपांडे
सह संघटक २- श्री. राजेंद्र शिंपी ,
सचिव – श्री. संजय पाचपोळे,
सह सचिव – श्री. नाना पाटील,
कोषाध्यक्ष – श्री. संजय शुक्ल,
महिला आघाडी प्रमुख – सौ. सुनिता बडगुजर,
कायदेशीर सल्लागार – अँड. एस. जी. शर्मा,
सदस्य – श्री. अनिलकुमार पालीवाल,
सदस्य – श्री. अभिजित पाटील,
सदस्य – श्री. गुरुबक्ष जाधवानी, याप्रमाणे कार्यकारिणी घोषित करून जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्यात. तसेच उपस्थित सर्वांनी नवीन कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष श्री. मनोज जैन व संघटक श्री. प्रकाश. ह. दलाल यांनी आपले मनोगत व्यक्त करून जिल्हा कार्यकारिणी सातत्याने एकत्रितपणे कार्य करून ग्राहकांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी कार्यरत राहील, असे आश्वासनही दिले. यानंतर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपला संक्षिप्त परिचय करून त्यांना त्यांच्या कामात येणाऱ्या अडचणी सांगून व भविष्यातील कामकाज सुलभ होण्यासाठी सूचना केल्यात. त्यानंतर सदर बैठकीचे अध्यक्ष व ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्य अध्यक्ष आदरणीय डॉ. विजयजी लाड यांनी देखील जिल्ह्याच्या नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा देऊन सर्वांनी एक दिलाने एकोप्याने आणि एकत्रितपणे ग्राहकांच्या समस्या सोडवून आपल्या संघटनेला वैभव प्राप्त करून द्यावे, यासाठी आपण प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलुयात, व नवीन कार्य आपण सुरु करण्याचे भावनात्मक आवाहन केले. तसेच ग्राहक संरक्षण परिषदेतील अशासकीय सदस्य निवड प्रक्रिया व कार्य याबाबत सविस्तर माहितीही त्यांनी दिली. संघटनेच्या भविष्यातील कामाचे नियोजन करून नवनवीन उपक्रम हाती घ्यावेत, ग्राहक मार्गदर्शन व जागृतीसाठी ग्राहक संरक्षण कायद्याबाबत प्रबोधन होणे गरजेचे आहे. संघटनेत नवनवीन लोकांना जोडण्याचा प्रयत्न करावा. नवीन कार्यकारणी आपल्या संघटनेचे काम वाढवून, संघटन वाढवावे. ग्राहकांच्या समस्या जाणून घेवून त्या सोडवाव्यात, यासाठी विभाग व राज्याची मदत लागल्यास जरूर घ्यावी. नाशिक विभाग व राज्य कार्यकारणी आपणास सदैव मदत करेल, असा विश्वास दिला. या मिटिंगमध्ये राज्य अध्यक्ष डॉ. विजयजी लाड, नाशिक विभाग अध्यक्ष श्री. बाबासाहेब जोशी, विभाग संघटक श्री. अरुणजी भार्गवे, विभाग सह सचिव अँड. सुरेंद्र सोनवणे, जिल्हाध्यक्ष श्री. मनोज जैन, जिल्हा संघटक श्री. प्रकाश. ह. दलाल, जिल्हा सचिव श्री. संजय पाचपोळे, कोषाध्यक्ष श्री. संजय शुक्ल, जिल्हा सह संघटक सौ. उज्वला देशपांडे, श्री. राजेंद्र शिंपी, श्री. नाना पाटील, श्री. मिलिंद मंडलेकर, सौ.स्मृती व्यास, सौ. पटणी, श्री. प्रल्हाद सोनवणे, श्री. सुबोध चौधरी, श्री. सचिन शेळके, श्री. उदय कुमार अग्निहोत्री, श्री. उदय सूर्यवंशी, श्री. शेखर जैन, श्री. महेश चावला, श्री. युवराज कुरकुरे, श्री. देवेंश वाणी आदी. सदस्य उपस्थित होते. सदर मिटिंगचे आयोजन व सूत्रसंचालन विभाग सह सचिव अँड. सुरेंद्र सोनवणे यांनी केले. आभार प्रदर्शन जिल्हा अध्यक्ष श्री. मनोज जैन यांनी केले, त्यांनी उपस्थित सर्वांचे आभार तर मानले. तसेच लवकरच ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन घेवून कामाची सुरुवात करण्यात येईल. त्याद्वारे ग्राहकांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी कार्यरत राहील असे आश्वासन दिले.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.