माजी जि. प. अध्यक्ष गोरखतात्या पाटील यांचे प्रतिपादन
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) ‘वीर गुर्जर’ शब्द उच्चारताच अंगात वीरश्री संचारते असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरखतात्या पाटील यांनी केले आहे. गुर्जर सम्राट राजा मिहिर भोज यांची जयंती गुर्जर दिवस म्हणून शहरातील गणेश कॉलनी भागातील कन्या विद्यालय येथे साजरी करण्यात आली या वेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीस युवा सेनेचे तालुकाध्यक्ष गोपाल चौधरी यांच्या हस्ते गुर्जर सम्राट राजा मिहिर भोज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय वीर गुर्जर महासभेचे कार्यकर्ते व गुर्जर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘मिहिर भोज प्रतिहार’ म्हणजेच राजा मिहिर भोज हे गुर्जर प्रतिहार राजवंशचे राजा होते. त्यांनी तब्बल ४९ वर्षे राज्य केले. त्यांचे साम्राज्य अत्यंत विशाल होते. राजा मिहिर भोज हे भगवान विष्णूचे भक्त होते. ४९ वर्षे राज्य केल्यानंतर पुत्र महेंद्रपालकडे राज्यकारभार सोपवून , संन्यास घेऊन वनात निघून गेले. राजा मिहिर भोज यांच्याकडे ३६ लाख सैनिक असल्याचा उल्लेख इतिहासात आहे. राजा मिहिर भोज पराक्रमी व प्रजादक्ष राजा होते, असे मत गुर्जर महासभेचे ज्येष्ठ नेते व जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरखतात्या पाटील यांनी व्यक्त केले.
मुख्याध्यापक विलास पी. पाटील यांनी गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी समाजबांधवांनी मिहिर भोज यांच्यापासून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.
सदर कार्यक्रमप्रसंगी एम.व्ही. पाटील (उपसभापती पंस.) , हितेंद्र देशमुख (उपनगराध्यक्ष नपा), एस. एच. पाटील (सामाजिक कार्यकर्ते ), विलास पी. पाटील, नंदकिशोर पाटील (सभापती कृउबा), एल. एस.पाटील, डी. बी. पाटील, आबा देशमुख (शिवसेना शहरप्रमुख ), राजाराम पाटील (नगरसेवक), महेश देशमुख, दुर्गादास पौलाद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. नितीन चौधरी, मंगल पाटील, बी. एल. देशमुख, एस. आर. पाटील, दीपक पाटील, कैलास चौधरी, पी. एस. पाटील, तुषार पाटील, ए. एम. पाटील,गोपाल पाटील, अशोक पाटील, प्रशांत पाटील, गोपाल पाटील, मनोहर पाटील, विनायक चौधरी, जयंत पाटील , महेश पाटील, सचिन पाटील, नंदकिशोर देशमुख, गुमान गुजर तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज पाटील यांनी केले, तर आभार प्रशांत पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिहीर भोज जयंती आयोजक समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.