भाद्रपद शुध्द तृतीयेचे हरतालिका हे व्रत कूमारीकांनी मनासारखा पती मिळावा म्हणून व सौभाग्यवतींनी पतीराज दीर्घायूषी, आरोग्यवान व्हावे म्हणून आवर्जुन करावे असा प्रघात आहे.
हरितालिका हे श्री पार्वती मातोश्रींचेच एक नाव , त्यांनी आपल्या प्रबळ इच्छेने खडतर तपश्चर्या करून श्री महादेवांना प्राप्त केले, याचीच आठवण म्हणून या व्रताचे आचरण केले जाते.
या व्रताचे दिवशी सूर्योदयाआधी उठून आवळ्याचे तेल व उटण्याने स्नान करावे, शूभ्र वस्त्र परिधान करावे.
उगवत्या सूर्यनारायणांना अर्घ्य देऊन ” ॐ असवादित्य ब्रह्म ” म्हणत स्वतः भोवती ३ प्रदक्षिणा घालाव्या..
आपल्या घरातील देवपूजा व नित्यसेवा पूर्ण करावी..
पूजेची मांडणी ….*
पूजेची जागा झाडून व गोमूत्राने स्वच्छ पूसून घ्यावी., सर्वत्र गोमूत्र शिंपडावे…
स्वच्छ केलेल्या जागेवर बेलपत्राची रांगोळी काढून त्यावर चौरंग कींवा पाट ठेवावा त्यावर पांढरे सूती/रेशमी वस्त्र अंथरुन मधोमध नदीच्या वाळूची श्री महादेवांची पिंड करावी..,
त्या पिंडीच्या पूर्वेला एक दूसरी छोटी पिंड (श्री हरितालिका/श्री पार्वती मातोश्रींची) करावी..
छोट्या पिंडीच्या समोर दोनही बाजूंना 2 शाळूंका (श्री जया व श्री विजया) कराव्यात..
श्री महादेवांच्या पिंडीसमोर विड्याच्या जोड पानांवर श्री गणेशांची मूर्ती/सूपारी ठेवावी.,श्री गणपतींसमोर एका छोट्या वाटीत गूळखोबरे ठेवावे…
श्री गणेशांच्या उजव्या बाजूला घंटी व डाव्या बाजूला शंख ठेवावा.
मांडलेल्या पूजेसमोर एका छोट्या पाटावर पांढरे कापड अंथरून त्यावर श्री हरितालिका व्रत कथेची पोथी ठेवावी.,पूजेभोवती रांगोळी काढावी…
पूजनाचा क्रम :
अष्टगंध , अक्षता , भस्म , हळदी-कुंकु , पूजनाची फूले , पत्री , दूर्वा , निवडलेले बेलपत्र – 130 , धूप , शूध्द तूपाचे निरांजन , खडीसाखर , तांब्याचा तांब्या , ताम्हण , पळी , पेला , विड्याची पाने , खारीक , बदाम , सूपारी , सूटी नाणी , यथाशक्ती दक्षिणा , खण ,गळेसरी , बांगड्या इ. साहित्य पूजेच्या ठिकाणी जमवून ठेवावे..
*मंगलतिलक*
” ॐ भद्रं कर्णेभि:…” शांतीमंत्र म्हणत कपाळाला हळदी-कुंकू लावावे…
*आचमन :—*
प्रथम ३ नावांनी उजव्या तळहातावर पाणी घेऊन प्राशन करावे.
1) ॐ केशवाय नमः !
2) ॐ नारायणाय नमः !
3) ॐ माधवाय नमः !
पूढील २ नावांना पाणी सरळ हाताने ताम्हणात सोडावे.
4) ॐ गोविंदाय नमः !
5) ॐ विष्णवे नमः !
पूढील नावे ध्यानपूर्वक म्हणावी..
6) ॐ मधूसूदनाय नमः !
7) ॐ त्रिविक्रमाय नमः !
8) ॐ वामनाय नमः !
9) ॐ श्री धराय नमः !
10) ॐ ऋषीकेषाय नमः !
11) ॐ पद्मनाभाय नमः !
12) ॐ दामोदराय नमः !
13) ॐ संकर्षणाय नमः !
14) ॐ वासूदेवाय नमः !
15) ॐ प्रद्यूम्नाय नमः !
16) ॐ अनिरुद्धाय नमः !
17) ॐ पूरूषोत्तमाय नमः !
18) ॐ अधोक्षजाय नमः !
19) ॐ नारसिंहाय नमः !
20) ॐ अच्यूताय नमः !
21) ॐ जनार्दनाय नमः !
22) ॐ उपेन्द्राय नमः !
23) ॐ हरये नमः !
24) ॐ श्रीकृष्ण परमात्मने नमः !
प्राणायाम :-
गायत्री मंत्र म्हणत १ प्राणायाम करावा.
विधीवत संकल्प :-
उजव्या तळहातावर पाणी , अक्षता व बेलपत्र घेऊन पूढील संकल्प म्हणावा…
सौभाग्यवतींसाठी :- मी ( अमूक ) गोत्रात उत्पन्न ( अमूक ) नावाची मला जन्मोजन्मी अखंडीत सौभाग्य प्राप्त व्हावे , धन-धान्य-पूत्र-पौत्रादिंची अभिवृध्दी व्हावी , दिर्घायूष्यादि सकल कार्यसिध्दीसाठी…*
कुमारीकांसाठी :- मी ( अमूक ) गोत्रात उत्पन्न ( अमूक ) नावाची मला मनेप्सित निर्व्यसनी , सच्चारीत्र्यवान , धार्मिक असा शोभन गूणमंडीत पती प्राप्त होण्यासाठी.
प्रतिवार्षिक विहीत श्री हरितालिका व्रत अंगभूत यथाशक्ती यथाज्ञानाने यथामिलीत उपचारांनी श्री उमा महेश्वर प्रीत्यर्थे श्री वालूका शिवलिंगांचे पूजन करीत आहे ! निर्विघ्नता सिद्धीसाठी श्री रिध्दी सिद्धी सहीत श्री महागणपती पूजन तसेच कलश , शंख , घंटी , दिप पूजन करीत आहे !
गणपतींचे पूजन :-
श्री गणेशांना *” ॐ गं गणपतये नमः ! “* या मंत्राचा जप करत गंध-अक्षता-हळदीकुंकु लावावे , लालफूल व दूर्वा वहाव्यात , धूप-दिप ओवाळून खडीसाखर किंवा गूळ-खोबर्याचा नैवेद्य दाखवावा…
हात जोडून नमस्कार करावा…
शुध्दीकरण :-
( शिव पंचाक्षरी मंत्राचा जप करत खालील कृती कराव्यात…)
आपल्या आसनाला नमस्कार करावा.
दाही दिशांना नमस्कार करावा.
पूजेच्या कलशात गंध-अक्षता-फूल-बेलपत्र-हळदीकुंकु वाहून नमस्कार करावा.
शंख धूवून पूसून पाणी भरुन जागेवर ठेवावे , त्यांना गंध-फूल व बेलपत्र वाहून नमस्कार करावा.
घंटी धूवून पूसून जागेवर ठेवावी , त्यांना गंध-अक्षता-फूल-हळदीकुंकु व बेलपत्र वाहून नमस्कार करावा,घंटी वाजवावी..
प्रज्वलित निरांजनाला गंध-अक्षता-फूल-हळदीकुंकु व बेलपत्र वाहून नमस्कार करावा.
शंखातील थोडे पाणी कलशात टाकावे व कलशातील पाणी हातात घेऊन सर्व पूजा साहित्यावर व स्वतःच्या अंगावर शिंपडावे..
*श्री वालूका शिवलिंगांचे पूजन…..*
प्राणप्रतिष्ठा :-
एक बेलपत्र तूपात बूडवून शिवलिंगावर ठेवावे..
डोळे मिटून एकाग्रचित्ताने 15 वेळा “ॐ” म्हणावा.
ध्यान :-
हात जोडून खालील ध्यान म्हणावे.
*”ॐ पीतकौशेय वसनां हेमाभां कमलासनाम् !*
*भक्तानां वरदां नित्यं पार्वतीं चिंतयाम्यहम् !!”*
*”विधाय वालूकालिंगम् अर्चयंतीम् महेश्वरम् !*
*”पूर्णेन्दुवदनां ध्यायेध्दरितालीं वरप्रदाम् !!”*
*”मंदारमाला कुलितालकायै कपालमालांकित शेखराय !”*
*”दिव्यांबरायै च दिगंबराय नमः शिवायै च नमः शिवाय !!*
*” ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! ” ध्यायामी नमस्काराणि समर्पयामी !!*
आवाहन :-
( खालील नाममंत्राने दोनही वालूकालिंगांना बेलपत्र वहावेत…)
*” ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! “*
*आवाहनार्थे बिल्वपत्राणि समर्पयामी !!*
आसन :-
( खालील नाममंत्राने चौरंगावर बेलपत्र वहावे…)
*” ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! “*
*आसनार्थे बिल्वपत्राणि समर्पयामी !!*
अभिषेक :-
( खालील नाममंत्राने दोनही वालूकालिंगांना गंधाक्षता फूल वाहून नमस्कार करावा… )
*” ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! “*
*अभिषेकार्थे गंधाक्षता पूष्पाणि समर्पयामी !!*
( खालील स्तोत्र मंत्र म्हणत
फूलाने पाणी शिंपडत अभिषेक करावा…)
*श्री गणपती अथर्वशिर्ष – 1 वेळा*
*श्री रात्री सूक्त – 1 वेळा*
*श्री रूद्राध्याय – 1 वेळा*
*” ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! “*
*अभिषेकं समर्पयामि !*
यज्ञोपवित :-
अभिषेकानंतर खालील मंत्र म्हणत दोनही वालूकालिंगांना जानवे वहावे…
*” ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! “*
*यज्ञोपवितं समर्पयामि !*
वस्त्र :-
खालील मंत्र म्हणत दोनही वालूकालिंगांना यथाशक्ती वस्त्र किंवा अक्षता वहाव्यात…
*” ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! “*
*वस्त्रं/वस्त्रार्थे अक्षतां समर्पयामि !*
दोन्ही वालूकालिंगांचे खालीलप्रमाणे पंचोपचार पूजन करावे.
१. दोनही वालूका लिंगास गंध-भस्म-अक्षता-हळदीकुंकु वहावेत..
ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः !
*विलेपनार्थे चंदनम् , भस्मं ! अलंकारार्थे अक्षतान् ! हरिद्रां-कुंकूमम् सौभाग्यद्रव्याणि* *समर्पयामि !!
श्री पार्वती मातोश्रींच्या पिंडीला गळेसरी , बांगड्या इतर सौभाग्य द्रव्य व अलंकार खालील मंत्राने अर्पण करावे..
*” ॐ श्री उमायै नमः !*
*” कंठसूत्रं , कंकणादि नानाविध सौभाग्य द्रव्याणि अलंकाराणि समर्पयामि ! “*
*२ .* दोनही वालूका लिंगांना सूगंधी फूले वाहावीत…
*”ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! “*
*ऋतू कालोद्भव पूष्पाणि समर्पयामि !*
*मुख्य विशेष पूजा…..*
*अथ अंगपूजनम् :—*
*श्री पार्वती मातोश्रींच्या पिंडीवर प्रत्येक नाममंत्राने त्या-त्या अवयवांची भावना करत अक्षता वहाव्यात…*
ॐ श्री उमायै नमः ! पादौ पूजयामि ! (पाय)
ॐ श्री गौर्यै नमः ! गुल्फौ पूजयामि ! (पोटर्या)
ॐ श्री पार्वत्यै नमः ! जानुनी पूजयामि ! (गूडघे)
ॐ श्री जगध्दात्र्यै नमः ! जंघे पूजयामि ! (मांड्या)
ॐ श्री जगत्प्रतिष्ठायै नमः ! ऊरू पूजयामि ! (ऊर)
ॐ श्री शांतिरूपिण्यै नमः ! कटी पूजयामि ! (कंबर)
ॐ श्री हरायै नमः ! गुह्यं पूजयामि ! (गुह्य भाग)
ॐ श्री माहेश्वर्यै नमः ! नाभिं पूजयामि ! (नाभि)
ॐ श्री शांभव्यै नमः ! ह्रदयं पूजयामि ! (ह्रदय)
ॐ श्री शूलपाणये नमः ! कंठं पूजयामि ! (कंठ)
ॐ श्री पिनाकधृषे नमः ! बाहूं पूजयामि ! (बाहू)
ॐ श्री शिवायै नमः ! मुखं पूजयामि ! (मुख)
ॐ श्री पशुपतिप्रियायै नमः ! नेत्रे पूजयामि ! (नेत्र)
ॐ श्री गंगायै नमः ! ललाटं पूजयामि ! (कपाळ)
ॐ श्री महालावण्यायै नमः ! शिरः पूजयामि ! (डोके)
ॐ श्री सच्चिदानंदरूपिण्यै नमः ! सर्वांगं पूजयामि ! (सर्व अंग)
*अथ पत्री पूजनम् :—*
*श्री पार्वती मातोश्रींच्या पिंडीवर खालीलप्रमाणे समंत्रक पाने / पत्री वहावीत…*
ॐ अशोकाय नमः ! अशोक पत्रं समर्पयामि ! (अशोकाचे पान)
ॐ जगध्दात्र्यै नमः ! धात्री पत्रं समर्पयामि ! (आवळीचे पान)
ॐ माहेश्वर्यै नमः ! दूर्वांकूरान् समर्पयामि ! (दूर्वा)
ॐ कपर्दिन्यै नमः ! करवीर पत्रं समर्पयामि ! (कन्हेराचे पान)
ॐ कपालधारीण्यै नमः ! कदंबपत्रं समर्पयामि ! (कदंबाचे पान)
ॐ पार्वत्यै नमः ! ब्राह्मी पत्रं समर्पयामि ! (ब्राह्मीचे पान)
ॐ धूर्जटायै नमः ! धत्तूर पत्रं समर्पयामि ! (धोत्र्याचे पान)
ॐ त्रिपूरांतकायै नमः ! अपामार्ग पत्रं समर्पयामि ! (आघाड्याचे पान)
ॐ सर्वेश्वर्यै नमः ! नानाविध पत्राणि समर्पयामि ! (पंचपल्लव)
अथ पूष्प पूजनम् :—*
*श्री पार्वती मातोश्रींच्या पिंडीवर खालीलप्रमाणे समंत्रक फूले वहावीत…*
ॐ चतुर्वर्गप्रदायै नमः ! चंपक पुष्पं समर्पयामि ! (चाफ्याचे फूल)
ॐ बुध्दिप्रियायै नमः ! केतकी पुष्पं समर्पयामि ! (केवडा)
ॐ कौमार्यै नमः ! करवीर पुष्पं समर्पयामि ! (कण्हेराचे फूल)
ॐ कुमार्यै नमः ! बकुल पुष्पं समर्पयामि ! (बकुळीचे फूल)
ॐ धनदायै नमः ! धत्तूर पुष्पं समर्पयामि ! (धोतर्याचे फूल)
ॐ शांभव्यै नमः ! शतपत्र पुष्पं समर्पयामि ! (सूर्यफुल)
ॐ चामुण्डायै नमः ! पद्मं समर्पयामि ! (कमळाचे फूल)
ॐ जगध्दात्र्यै नमः ! जपाकुसुमं समर्पयामि ! (जास्वंदाचे फूल)
ॐ माहेश्वर्यै नमः ! मल्लिका पुष्पं समर्पयामि ! (मोगर्याचे फूल)
ॐ मेरूमंदारवासिन्यै नमः ! मांदार पुष्पं समर्पयामि ! (पांढर्या रूईचे फूल)
*श्री महादेवांच्या पिंडीवर श्री शिव अष्टोत्तरशत नामावली म्हणत 108 बेलपत्र अर्पण करावेत…*
*४ .* दोनही वालूका लिंगांना खालील मंत्र म्हणत धूप ओवाळावा…
*”ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! “*
*धूपं आघ्रापयामि !*
*४ .* दोनही वालूका लिंगांना खालील मंत्र म्हणत शूध्द तूपाच्या निरांजनाने ओवाळावे…
*”ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! “*
*दिपं दर्शयामि !*
*५ .* दोनही वालूकालिंगांना फळे व खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा तसेच
विडा , दक्षिणाही अर्पण करावी…
*”ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! “*
*नानाविध फलानी शर्करा खंड खाद्यानी नैवेद्यं समर्पयामि !*
*पूगीफलं स तांबूलं तथाच दक्षिणां समर्पयामि !*
*श्री हरीतालिका व्रताची कथा वाचावी…*
*कथा वाचल्यानंतर श्री गणपतींची , श्री हरितालिकेची व श्री शंकरांची अशा क्रमाने आरती करावी…*
आरतीनंतर स्वतःभोवती ३ प्रदक्षिणा करून नमस्कार करावा व मंत्रपूष्पांजली म्हणून फूले-बेलपत्र दोनही वालूकालिंगांवर अर्पण करावी.
विशेष अर्घ्य :— पळीत पाणी घेऊन त्यात गंध-अक्षता-फूल-सूटे नाणे व सूपारी ठेवावी…*
*पूढील प्रत्येक मंत्राला वरीलप्रमाणे अर्घ्य आपल्या उजव्या हाताने ताम्हणात सोडावे..*
*ॐ शिवरूपे शिवे देवि शंकर प्राणवल्लभे !*
*उमे सर्वार्थदे देवी गृहाणार्घ्यं नमोsस्तुते !!*
*”ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! “*
*इदमर्घ्यं समर्पयामि !*
*ॐ नमस्तेsस्तु मृडानीश अपर्णा प्राणवल्लभ !*
*भक्त्याssनीतं मया हीदं गृहाणार्घ्यं नमोsस्तुते !!*
*”ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! “*
*इदमर्घ्यं समर्पयामि !*
*ॐ व्रतसंपूर्ति सिद्धयर्थं यथाशक्ती मयाssह्रतम् !*
*आलिभि:सहिते देवी गृहाणार्घ्यं नमोsस्तुते !!*
*”ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! “*
*इदमर्घ्यं समर्पयामि !*
*हात जोडून मनोभावे पूजेत झालेल्या चूकांबद्दल क्षमा मागावी…*
*खालील प्रार्थना म्हणावी…*
*हरितालिके नमस्तेsस्तु सशिवे भक्तवत्सले !*
*संसारभय भीताsहम् त्वमेव शरणं मम !*
*जन्मजन्मनि सौभाग्य मक्षय्यं देहि मेsव्ययम् !!*
*शेवटी हातात पाणी घेऊन ” मी माझ्या ज्ञानानूसार व मिळालेल्या उपचारद्रव्यांनी श्री हरीतालिका व्रतानिमित्त केलेले श्री वालूकालिंगार्चन श्री उमा महेश्वरांना प्रिय होवो… ” असे म्हणून पाणी ताम्हणात सोडावे.*
या दिवशी व्रतस्थ महिलांनी अन्नग्रहण करू नये केवळ फलाहार करावा.
सायंकाळी पूजेस धूप दिप ओवाळून दूध-साखरेचा नैवेद्य दाखवावा.
मध्यरात्रीपर्यंत शिव शक्तींचे नामस्मरण करत जागरण करावे.
मध्यरात्री पून्हा श्री गणेश , श्री हरितालिकेची व श्री महादेवांची आरती करून रूईच्या स्वच्छ पानावर थोडे दही घालून ते पान चाटावे.
दूसर्या दिवशी पूजेवरील सर्व निर्माल्य काढून दोनही वालूकालिंगांना गंध , भस्म , अक्षता , हळदी-कुंकु , फूले व बेलपत्र वहावेत ;
धूप , दिप ओवाळून दही भाताचा नैवेद्य दाखवावा.
श्री गणपतींची , श्री हरितालिकेची व श्री शंकरांची अशा क्रमाने आरती करावी.
आरतीनंतर स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा करून नमस्कार करावा व मंत्रपूष्पांजली म्हणून फूले-बेलपत्र दोनही वालूकालिंगांवर अर्पण करावी.
विसर्जन मंत्राने पूजेवर अक्षता वाहून दही-भाताच्या नैवेद्यासह सर्व पूजा प्रवाहात विसर्जीत करावी.
पतीराजांचे पाद्यपूजन करून उपवास सोडावा.