• Sat. Jul 5th, 2025

रोटरी क्लब चोपडातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) रोटरी क्लब चोपडा आयोजित व डिस्ट्रिक्ट ३०३० चा स्टॉप एन.सी.डी. प्रोजेक्ट अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन चोपड्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. दीपक चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल शब्बीर शाकीर आपल्या संदेशात म्हणाले, रोटरी मेंबर वर्षभर सामाजिक सेवेत व्यस्त असतात. आणि अशा या कोरोना काळात त्यांचीसुद्धा तब्येत ठणठणीत असणे गरजेचे आहे. म्हणून आज सर्व रोटरी सदस्य व त्यांच्या परिवाराचे रक्तदाब, शुगर टेस्ट, वजन, उंची सोबतच बीएमआय, बीएमआर., टीएसएफ, मसल्स परसेंटेज, बॉडी फॅट पर्सेंटेज तसेच शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण, अशा अनेक टेस्ट आधुनिक मशीनद्वारे आज करण्यात आल्या.

दररोजच्या जीवनात साखर तेल व मीठ कमी करण्याचे तसेच विशेष आहार आणि व्यायमाचे महत्व डॉ. दीपक चौधरी यांनी आपल्या भाषणात पटवून दिले. सदर शिबिरासाठी रोटरी अध्यक्ष नितीन अहिरराव, सचिव रुपेश पाटील, प्रकल्प प्रमुख डॉ. नीता जैस्वाल, डॉ. वैभव पाटील, पुनम गुजराथी, मुरलीधर पाटील, विलास एस. पाटील, डॉ. पराग पाटील, पी. बी. पाटील, विनोद अग्रवाल, महेंद्र बोरसे, डॉ. शेखर वारके, अर्पित अग्रवाल, चेतन टाटीया, चंद्रशेखर साखरे, दीपक लोहाणा, ईश्वर सौंदणकर व
चोपडा रोटरीचे सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच सदर प्रकल्पास न्यू लाइफ सेंटरचे संचालक मितेशभाई सुगंधी यांचे विशेष सहकार्य लाभले. तर डिस्ट्रिक्ट ३०३० चे स्टॉप एनसीडी प्रोजेक्ट चेअरमन डॉ. जुगल चिनोरिया व सह-प्रांतपाल योगेशजी भोळे यांचेही मार्गदर्शन लाभले.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.