चोपडा (साथीदार वृत्तसेवा) तालुक्यातील आत्महत्याग्रस्त तीन शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाखाचे धनादेश व राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत आठ लाभार्थ्यांना प्रत्येकी वीस हजार रुपयांचे धनादेश आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. याप्रसंगी संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य जिल्हाप्रमुख महिला आघाडी रोहिणीताई पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, शहरप्रमुख आबा देशमुख, जि.प.सदस्य हरिषभाऊ पाटील, महिला आघाडी तालुकाप्रमुख मंगलाताई पाटील, नगरसेवक किशोर चौधरी, गुलाब ठाकरे, माणीकबापू महाजन, ए.के गंभीर सर, संतोष अहिरे, संजय शिरसाठ,गोपाल चौधरी, किशोर कोळी व तसेच तहसीलदार अनिल गावीत, गटविकास अधिकारी बी.एस.कोसोदे, नायब तहसीलदार राजेश पऊळ, अव्वल कारकून अविनाश जाधव, योगिता नाळदे आदी उपस्थित होते.