• Sat. Jul 5th, 2025

जाणून घ्या, ऋषीपंचमीचे महत्त्व, आशय

ऋषीपंचमी : भाद्रपद शुद्ध पंचमी

भाद्रपद शुद्ध पंचमी ही भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील पाचवी तिथी आहे.

हिंदूंच्या चालीरीतींप्रमाणे, भाद्रपद शुद्ध पंचमी हे स्त्रियांनी करावयाचे एक व्रत आहे. या दिवशी स्त्रिया ऋषींची मनोभावे व षोडशोपचारे पूजा करतात. यावरून या दिवसाला ऋषिपंचमी हे नाव मिळाले.

कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्रि या सात ऋषींची प्रत्येकी एक आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधतीची एक अशा एकुण ८ सुपाऱ्या मांडून ही पूजा सिद्ध केली जाते.

या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतःच्याच कष्टाचे अन्न खावे, हा यामागचा संकेत वा संदेश आहे.

अशा रितीने ‘स्वकष्टार्जित’ या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे.

आपल्या जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धान्ताचे वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करत राहावे, याची आठवण देण्यासाठी ही ऋषिपंचमी आहे.

” आप सुखी रहे धनधान्य आरोग्य पाये यही कामना !!

आशय व महत्व :

गृहस्थाश्रमी पुरुषांच्या बाबतीत या व्रताची मुख्य योजना मुख्यत: आचार प्रणालींची ओळख व्हावी व गृहस्थाश्रम हा त्यांच्याप्रमाणेच आचारसंपन्न व्हावा या हेतूने असतो.

स्त्रियांनी रजोनिवृत्तीनंतर हे व्रत अशा प्रकारे केल्यास त्यांच्याकडून पूर्वी रजोदर्शन काळात घडलेल्या स्पर्शात्मक दोषांचे मानसिक पातळीवर निरसन होऊ शकते.

ज्या विद्यार्थ्याना श्रावणी (वेदाध्ययन करणा-या वर्गासाठी विहित व्रत) संस्काराचा लाभ होत नाही अशा सर्ववर्णीय स्त्री पुरुषांनी त्यांच्या नित्य कर्मातील त्रुटी व स्खलन यांच्या परिहारासाठी ऋषीपंचमी हे व्रत करावे.

व्रताचार :

कोणत्याही व्रताचा काल व आचार निर्धारित होताना भौगोलिक वातावरणाचा प्रामुख्याने विचार केलेला असतो.

त्यानुसार चातुर्मास काळात येणा-या या ऋषी पंचमी व्रतामध्ये ऋषी पूजनाखेरीज आघाड्याच्या काष्ठाने दंतधावन,पंचगव्य प्राशन,सुवासिनींना हरीद्रास्नान,भस्मस्नान,गोमय स्नान,मृत्तिकास्नान,महासंकलपयुक्त तीर्थस्नान,अर्घ्यदान,अशा अनेक महत्वाच्या विधींचा अंतर्भाव केलेला आहे.

ऋषी पंचमीच्या दिवशी विशिष्ट व्रतताहार आणि ऋषी स्मरण (सप्तर्षीची पूजा ) या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या असून धर्मशास्त्रकारांना अभिप्रेत असणारा व्रताहार हा नेहमीच्या उपवासाहून पूर्णतया भिन्न आहे.कारण एरवीच्या उपासात रसाहार,फलाहार कींव्हा हविष्यान्न विहित असते.

परंतु ऋषी पंचमीच्या दिवशी व्रताहारामध्ये केवळ मानवी कष्टातून उत्पन्न झालेले अर्थात, न नांगरलेल्या जमिनीमधील पदार्थाचे सेवन करणे अभिप्रेत असते.तसेच या व्रतातील विविध स्नाने सांप्रतकाली लोकप्रिय असणा-या निसर्ग उपचार प्रणाली मध्ये आचरली जातात व त्यापासून होणारे लाभही दिसून येतात

यासाठी करतात ऋषिपंचमी :

रजस्वला दोष नाहीसा करण्यासाठी प्रायश्चित्त म्हणून हे व्रत केलं जातं.

भाद्रपद शुद्ध पंचमी ऋषिपंचमी हे व्रत करावे.

मासिक पाळी, अशौच आणि स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या व्रताने कमी होतो.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.