.
चोपडा : रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे पंकज बोरोले यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडेकर रसिक श्रोत्यांसाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते प्रशांत देशमुख ( रायगड ) यांचे “जगणं सुंदर आहे” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
रोटरी क्लब ऑफ चोपडातर्फे नेहमीच विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते. कोरोना काळातही रोटरी क्लब ऑफ चोपडा या संस्थेने विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले. मागील दीड – दोन वर्षाच्या कालावधीत मन सुन्न करणाऱ्या अनेक अघटित घटना घडल्या. दीड-दोन वर्षे जगानं खूप सोसलं. जग आता हळूहळू मोकळेपणाने श्वास घ्यायला सुरुवात करीत आहे.
कोरोनाच्या या काळात मनं भेदरलेली आहेत. काहींनी जवळची माणसे देखील गमावली आहेत. काहींचा आत्मविश्वास गमावला आहे .उद्योग व्यवसायाचे प्रश्न समोर उभे आहेत. या सर्व बाबींवर मात करण्यासाठी एकदा सज्ज व्हायचं आहे. जगण्याची सुंदरता वाढविण्यासाठी, सकारात्मकता निर्माण करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ चोपडातर्फे महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते प्रशांत देशमुख ( रायगड ) यांचे “जगणं सुंदर आहे” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन चोपडेकर रसिक श्रोत्यांसाठी आज सायंकाळी ७:३० वा पंकज बालसंस्कार केंद्र पंकज नगर येथे केले आहे.
सदर व्याख्यानाच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले , सचिव रोटे प्रवीण मिस्त्री , प्रोजेक्ट चेअरमन रोटे प्रकाश पाटील ,खजिनदार रोटे भालचंद्र पवार आदी परिश्रम घेत आहेत.