चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील ज्येष्ठ नागरिक संघाकडून फेसकॉम चा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
नारायण वाडीतील विठ्ठल मंदिर समोरील ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यालयामध्ये संघाचे अध्यक्ष विजय करोडपती यांनी जागतिक ज्येष्ठ नागरिक संघ दिनाची माहिती देताना सांगितले की , एक ऑक्टोबर 1958 पासून साजरा होऊ लागला . वृद्धांच्या दैनंदीन अडचणींचा अभ्यास करून भारतातील पहिला ज्येष्ठ नागरिक संघ डोंबिवली येथे रोटरीचे सदस्य आर एन भट यांनी स्थापन केला वर्षभरातच या संघाला चांगला प्रतिसाद मिळून त्याच्या दिडशेच्या आसपास शाखा स्थापन झालेने या शाखाचे काम एकसुत्रतेने होणे गरजेचे असल्याने दिनांक 12 डिसेंबर 1978 ला महासंघात फेसकॉम (फेडरेशन ऑफ सिनियर सिटीजन) मध्ये रूपांतर करण्यात आल. म्हणून आज त्याचा 41वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत असल्याचे सांगितले.
या वेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव प्रमोद शंकर डोंगरे यांनी सूत्रसंचालन केले , कार्यक्रमास उपाध्यक्ष एम डब्लू पाटील , जयदेव देशमुख, एन डी महाजन, जे एस नेरपगारे, अनिल पालिवाल, पी डी बैरागी , गोविंदा महाजन , सुभाष पाटील , शिरीष गुजराथी, यशवंत जडे , आदी उपस्थित होते.